शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 3:36 PM

माणूस आणि टेक्नॉलॉजी हे नातंच आता बदललं. आता टेक्नॉलॉजी माणसाच्या पुढे निघतेय.

- डॉ. भूषण केळकर

इण्डस्ट्री ४.० विषयी आपण बोलतोय. गेल्या आठवड्यात इंडस्ट्री १.० ते ३.० पर्यंतचा प्रवास कसा झाला हे पाहिलं. आणि त्यापुढचा म्हणजेच औद्योगिक क्रांतीचा अर्थात इंडस्ट्री ४.० ची सुरुवात हा टप्पा आला. तो २०११ मध्ये. म्हणजे ज्याची चर्चा आपण करतोय तो काळ सुरू झालेला आहे. आणि त्यासाठी लागणारी इको सिस्टिमही आधीच तयार होत होती. त्यामध्ये होतं आयओटी. अर्थात इंटरनेट आॅफ थिंग्ज. क्लाउड कम्प्युटिंग. रोबोटिक्स आणि एआय अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्स. त्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट अंतर्भूत झाल्याने इंडस्ट्री ४.० तयार झालं. ती म्हणजे सायबर फिजिकल सिस्टिम. म्हणजेच स्वत:चं नियंत्रण स्वत: करू शकणारी, आभासी (सायबर) व मूर्त (फिजिकल) जगाला जोडली गेलेली प्रणाली.इंडस्ट्री ४.० ची सुरुवात २०११ मध्ये झाली ती इंडस्ट्री ४.० या नावाने. जर्मन सरकारनी कार्यान्वित केलेला एक हायटेक स्ट्रॅटेजी प्रोजेक्ट स्मार्ट फॅक्टरी म्हणून मांडला गेला. हानओव्हर फेअर ही जगप्रसिद्ध औद्योगिक व यंत्र जगतातील ‘जत्रा’. २०११ मध्ये तिथं इंडस्ट्री ४.० या नावाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आणि मग पुढे हेच नाव प्रचलित झालं.आॅक्टोबर २०१२ मध्ये इंडस्ट्री ४.० वर्कग्रुपने जर्मन सरकारला त्यांच्या सूचना व संकल्पना सादर केल्या. त्यामुळेच या वर्कग्रुपच्या सदस्यांना इंडस्ट्री ४.० चे संस्थापक/जनक मानलं जातं. ८ एप्रिल २०१३ मध्ये पुन्हा एकदा हॅनोव्हर जत्रामध्येच इंडस्ट्री ४.० चा अंतिम मसुदा व अहवाल सादर केला गेला. त्याच वर्षी आपल्याला माहिती असणाºया ‘मॅकेन्झी’ या जगप्रसिद्ध कंपनीने Siegfriend Dais या बॉश जर्मन कंपन्यांच्या अधिकाºयांची मुलाखत घेतली. मुलाखत घेतली व त्यातून जो वेग इंडस्ट्री ४.० ने पकडला तो धडाक्यातच. २०१४ पासून जर्मनीच नव्हे तर अन्य अनेक विकसित व विकसनशील देशांनी इंडस्ट्री ४.० ची अपरिहार्यता, उपयुक्तता आणि ताकद ओळखली. ती कार्यान्वित केली.आणि आता ती लाट आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे. मानव आणि तंत्रज्ञान यांच्यातलं नातंच त्यानं बदलेल. त्यानं आपल्यावर कसा परिणाम होतोय त्याविषयी पुढच्या लेखात

इंडस्ट्री ४.० चं तंत्र काय?

इंडस्ट्री ४.० ची थोडी तांत्रिक परिभाषेत ओळख करून घेऊ. kagermaun whalster आणि Helbing यांच्या २०१३ च्या मसुद्यानुसार चार अत्यंत महत्त्वाची सूत्रं इंडस्ट्री ४.० मध्ये अंतर्भूत आहेत.१) इण्टरोपरॅबिलीट म्हणजे यंत्रे- उपकरणं, सेन्सर्स व माणसं हे चारही घटक एकमेकांना इंटरनेटने जोडलेलं असणं. यात आयओटी येतं आणि आय आयओपी म्हणजेच इण्टरनेट आॅफ पिपलसुद्धा येतं. उदा. आपण आता मोबाइल वापरून घरातील ए/सी. बंद करू शकतो.२) इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी. माहितीची पारदर्शकता भौतिक व मूर्त जगाची आभासी व डिजिटल प्रतिकृती उपलब्ध असणं. ही डिजिटल प्रतिकृती असल्यानं ती सर्वांना सर्व ठिकाणी सर्वकाळ उपलब्ध असणं. उदाहरणार्थ एखाद्या भल्यामोठ्या अजस्त्र कारखान्यातील कोपरान् कोपरा आणि प्रत्येक यंत्र वा उपकरण नेमकं काय स्थितीत आहे याची माहिती कंट्रोल रूममध्ये असणं. ती कुठेही शेअर करता येणं. सोपं सांगू, ते म्हणजेच सीसीटीव्ही!३) तांत्रिक मदत अर्थात टेक्निकल असिस्टन्स. सर्व माहितीच्या आभासीकरण व पारदर्शकतेमुळे माणसाची निर्णयप्रक्रिया सोयी करण्यासाठी केलेली मदत. त्याचबरोबर ती अंमलात आणण्यासाठीची मदत.४) निर्णयांचे विकेंद्रीकरण करणं. यंत्रे, उपकरणे, सेन्सर्स याबद्दलचे निर्णय कुठूनही घेता येण्याची क्षमता व त्याचबरोबर स्वयंनिर्णयांची व स्वयंसिद्धतेची क्षमता या यंत्र व उपकरणांमध्ये असणं.

(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)