सावधान! डिजिटल प्रेझेन्स तुमची संधी घालवू शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 07:00 IST2019-08-29T07:00:00+5:302019-08-29T07:00:06+5:30

आपलं ऑनलाइन अस्तित्व कसं आहे? कशी आहे तिथं तुमची इमेज? तिथं काय काय पोस्ट करता? यावर नुसतं तुमचं तिथलं अस्तित्वच नाही तर तुमच्या नोकरी मिळण्या - न मिळण्याच्या शक्यताही अवलंबून आहेत.

Careful! Digital Presence Can Reduce Your job Opportunity! | सावधान! डिजिटल प्रेझेन्स तुमची संधी घालवू शकतो!

सावधान! डिजिटल प्रेझेन्स तुमची संधी घालवू शकतो!

ठळक मुद्देआपण आपल्या डिजिटल प्रेझेन्समध्ये काय करणं उत्तम आणि काय घातक याची ही एक चेकलिस्ट.

- डॉ. भूषण केळकर

परवा कॉलेमध्ये माझं सॉफ्ट स्किल्सवरचं सेशन झालं आणि घरी परत असताना एक मलगी धावत आली आणि म्हणाली, सर, मला गुगलकडून आपणहून फोन आला होता  इंटर्नशिपसाठी, मी ती प्रोसेस पुढे चालू ठेवू का हे सगळं फेक असू शकेल?
त्यापुढे तिचं म्हणणं मला महत्त्वाचं वाटलं. ती म्हणाली की, माझा सेमिनार स्पीच रेकगनायझेशनमधे होता हेसुद्धा त्यांनी आपणहून सांगितलं. फोनवर आणि त्याच संबंधीची इंटर्नशिप आहे म्हणाले.
मी आधीतच तिला डोमेन चेक करून मग रिझ्युम पाठवायला सांगितला. पण मला या प्रकारच्या प्रॉडक्टिव्ह रिक्रूटमेंट म्हणजे तुम्ही अर्ज न करता कंपन्यांनी तुम्हाला आपण होऊन इमेल/एसएमएस/फोन करण्याचं काही आश्चर्य वाटलं नाही. कारण तोच सध्याचा ट्रेण्ड आहे. 
अगदी फ्रेशर्सकरितासुद्धा.
आणि म्हणून सॉफ्ट स्किल्सच्या माझ्या सेशनमध्ये मी गेली 5 वर्षे डिजिटल प्रेझेन्स (आभासी अस्तित्व !) यावर मुलामुलींशीच काय अगदी कंपन्या व सरकारी अधिकार्‍यांच्या ट्रेनिंगमध्येही सतत बोलतोय.
आता आपण काही आकडे पाहू म्हणजे तुम्हालाही या डिजिटल  प्रेझेंनसचं महत्त्व कळेल.
* 93 % कंपन्या या आजकाल लिंकडीन वरून कर्मचारी भरती करत आहेत !
* 66 % कंपन्या फेसबुकवरून आणि 58 % कंपन्या ट्विटरवरून !
माझा सर्व वाचक मित्र-मैत्रिणींना प्रश्न आहे की, तुमच्यापैकी किती जण लिंकडीनवर आहेत? बहुधा तुम्ही सर्वजण एफबीवर असाल क्वचित ट्विटरवरपण असाल; परंतु लिंकडीन वर आहात का? ते एक प्रोफेशन नेटवर्क आहे. वाढदिवसाचे फोटो आणि पार्टीची धमल वा नवीन आणलेलं नेलपेण्ट किती सूट होतंय हे दाखवण्यासाठी एफबी असेल; परंतु लिंकडीनवर फक्त प्रोफेशनल गोष्टीच मांडल्या जातात. आणि कंपन्या त्या तपासत असतात. 
मतितार्थ हा की जर तुम्ही लिंकडीनवर नसाल तर आजच अकाउण्ट (फुकट असतंय !) उघडा आणि तुमची प्रोफेशनल माहिती त्यावर नीट विचारपूर्वक अपलोड करा. न जाणो कंपन्या तुम्हालासुद्धा पुढील महिन्यात जॉबसाठी कॉण्टॅक्ट करतील आपण होऊन!
त्यामुळे हे प्रोफेशनल अकाउण्ट कसं वापरायचं, त्यावर काय लिहायचं काय लिहायचं नाही हे जरा समजून घ्या.  पुढील संवादात हा विषय आपण अजून पुढे नेऊ !
*****
डिजिटल सावधान!

 

1. फेसबुक, लिंकडीन, ट्विटर इ. वर तुम्ही सक्रिय असावंच. पण तुमचं यश, नवे प्रकल्प तिथं वेळेत अपलोड करावेत.
2. या सर्व फ्लॅटफॉर्म्सवर तुमचं नाव एकच असावं. म्हणजे मी लिंकडीनवर भूषण व एफबीवर भूषण केळकर आणि ट्विटरवर डॉ. भूषण केळकर असं वेगवेगळं नाव ठेवू नये. सगळीकडे सारखंच असावं. कारण ज्याला एसईओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन म्हणतात. त्यात तुमचं प्रोफाईल उठावदारपणे दिसणार नाही. एकच  नाव सगळीकडे नियमित ठेवलंत तर उपयोग होईल.
3. आक्षेपार्ह मजकूर गमतीतसुद्धा नको. असं दिसून आलंय की एफबी वगैरे वर 28 % लोकांचा मजकूर धार्मिक 15 % लोकांचा मजकूर हा वर्ण /लिंग इ. वरचे विनोद असा असतो. 54 %  लोकांच्या लिखाणात स्पेलिंग मध्ये चूक असते. शुद्धलेखन नीट नसतं. हे सर्व घातक ठरू शकतं.
4. वेडेवाकडे फोटो व्हिडीओ अपलोड करूच नका; पण इतरांनी ते केले व तुम्हाला टॅग केलं असेल तर तत्काळ अनटॅग पण करा. किमान एवढी पत्थ्यं तरी पाळलीच पाहिजेत.

Web Title: Careful! Digital Presence Can Reduce Your job Opportunity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.