सेण्टी माचोचा स्पाइक लूक
By Admin | Updated: September 10, 2015 21:57 IST2015-09-10T21:57:30+5:302015-09-10T21:57:30+5:30
तरुण मुलं तोंडाला लाली पावडर लावतील, गोरं होण्याच्या क्रीम फासतील असं कधी वाटलं होतं आपल्याला?

सेण्टी माचोचा स्पाइक लूक
तरुण मुलं तोंडाला लाली पावडर लावतील,
गोरं होण्याच्या क्रीम फासतील
असं कधी वाटलं होतं आपल्याला?
***
मुलींसाठीचे ब्यूटिपार्लर होतेच,
मुलांसाठी फक्त दाढीकटिंगची दुकानं.
ते मागं पडून ‘फक्त पुरुषांसाठी’ असे ब्यूटी सलोन सुरू झाले
आणि तेही कमीच म्हणून आता मोठय़ा शहरांत
‘युनीसेक्स’ ब्यूटी सलोन सुरू झाले.
तरुण मुलं तिथे फक्त दाढीकटिंगसाठी नव्हे,
तर फेशियल ते व्हॅक्स ते हेड मसाज ते स्टिमबाथर्पयत जाऊ लागले.
तरुण मुलं? आणि फेशियल करतील?
असं कधी वाटलं होतं कुणाला?
***
तरुणांसाठीचे हेअर लोशन्स,
त्यांच्यासाठीचे डिओडरण्ट,
ते वापरल्यानं इम्प्रेस होणा:या मुली,
फेअरनेस क्रीमच्या जाहिराती,
वजन वाढवणा:या पावडरींच्या
आणि स्लीम करणा:याही पावडरींच्या जाहिराती
आता टीव्हीवर सर्रास दिसतात !
मात्र पुरुषांसाठीच्या अशा जाहिराती बनतील
आणि त्यासाठीचे ग्राहकही असतील
असं कधी वाटलं होतं कुणाला?
***
मात्र हे सारे बदल झाले.
रफटफ, रांगडा लूक मागे सोडून
मेट्रोसेक्शुअल नावाची
एक नवीच ओळख तरुणांनाही आवडू लागली.
थोडा नाजूक, काहीसा रोमॅण्टिक,
प्रसंगी सेन्सिटिव्ह, मधूनच माचो.
कधी रागीट, कधी संतापी मारधाडवाला,
कधी पङोसिव्ह, तर कधी सपोर्टिव्ह अशी
नवीच इमेज तयार झाली.
ती कशामुळे?
****
कॉलेजात मैत्रिणी,
त्यांच्याशी बदलती, मोकळीढाकळी दोस्ती,
कार्यालयातील सहकारी महिला,
त्यांच्याशी जमवून घेत करावे लागणारे काम,
सगळीकडेच मुलींचं जग बदललं.
आणि त्या बदलाच्या रेटय़ानं का होईना
तरुणांचं जगही बदललंच.
**
मात्र ते बदल होत असताना,
आणि स्वत:ला बदलवत असतानाही
अनेक तरुणांना वेगळ्याच गोचीला सामोरं जावं लागतं?
त्यांना कळतच नाही की,
मॉडर्न काय? टिपिकल काय?
आभास काय? वास्तव काय?
आपण नेमकं कसं वागायचं?
अशाच ‘गोंधळलेल्या जगाची’ एक झलक.
आतल्या पानात.
- ऑक्सिजन टीम
बदलू म्हणणा:या तरुणांचं
नेमकं बिनसतं कुठं?
लेखन
अदिती नाईक, अनघा पाठक