शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

सरकारी कार्यालयात गेलं की विकेट उडते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 6:20 AM

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या म्हणीची तपासणी

ठळक मुद्दे आपण अशी किती सरकारी कार्यालयं जवळून बघितलेली असतात ?

प्राची  पाठक 

‘सरकारी बाबू’शी आपली ओळख तशी अधूनमधून झालेलीच असते. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही जणू टॅगलाइन होऊन गेल्यासारखं आपण मानत असतो. एकीकडे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल का, याची अशा लावून बसलेलो असतो. - का? तर तिथे काही कामच करावं लागत नाही, असा आपला समज असतो. आपण अशी किती सरकारी कार्यालयं जवळून बघितलेली असतात की त्यावरून आपण असा समज करून घेतो, हा प्रश्न आपल्याला पडत नाही. सरकारी नोकरी म्हणजे आरामाची नोकरी, अशीच आपली कल्पना असते. एकदा चिकटलो की चिकटलो. काम करा, नका करू, वेळेत जा, नका जाऊ, आपल्याला कोण तिथून काढू शकणार? नोकरीत आपला परफॉर्मन्स कोण तपासणार? एकदम सुखाची नोकरी. सरकारी नोकरीविषयी अशा कल्पना असूनसुद्धा आपलं तिथे काही काम अडलं, तर ते मात्न चुटकीसरशी तिथल्या लोकांनी करून द्यावं, अशी आपली अपेक्षा असते.  

काय करता येईल?   कोणकोणत्या कारणांसाठी आपल्याला वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये जावं लागतं, त्याचा विचार करू. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, गाडीचं लायसेन्स, जन्म दाखले, मृत्यू दाखले यासाठी आपण स्वतर्‍ वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन त्यासाठी काय काय कागदपत्नं जोडावी लागतात, कसे अर्ज द्यावे लागतात, ते समजून घेऊ. आपल्या नात्यांमध्ये, आपल्या आजूबाजूला असलेले सरकारी कर्मचारी त्यांच्या कामाविषयी काय बोलतात, याची माहिती करून घेऊ. आपली लहानमोठी कामं एखाद्या एजंटकडून करून घेण्यापेक्षा, आपणच पुढाकार घेऊन सरकारी कार्यालयांमध्ये गेलं पाहिजे. त्या कागदपत्नांची पूर्तता करायला शिकलं पाहिजे. फॉलोअप घेतला पाहिजे. सरकारी कर्मचार्‍यांचेही काही प्रॉब्लेम असू शकतात, काही प्रोटोकॉल्स त्यांना पाळावे लागतात, ते आपल्याला जाणून घेता येईल. अपुर्‍या मनुष्य मनुष्यबळात ते काम करत असतात, हे समजून घेता येईल. त्यांच्यावरच्या कामाचा ताण आपल्याला जाणवेल. सरकारी कामांमध्ये चालढकल होते, हे मान्य करूनसुद्धा त्यातले काही मुद्दे आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावतील.

त्याने काय होईल?  1- सरकारी यंत्नणेविषयी आपल्या मनात असलेली चीड आणि आढी थोडीफार कमी होण्यास मदत होईल. 2- सरकारी कर्मचारीसुद्धा माणसंच आहेत आणि वेगवेगळ्या आव्हानांमध्ये ते काम करत आहेत, हे आपल्याला समजेल. 3- लहानमोठय़ा सरकारी कामांसाठी आपण स्वतर्‍ वेळ काढायला लागू. 4- सरकारी व्यवस्थेबद्दलची आपली जाणीव विकसित होईल.