शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

घरात बसा ऑनलाइन दिसा ! ऑनलाइन असण्याचा ताण छळतो आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 2:37 PM

लॉकडाऊनच्या या काळात तुमचा ताण, मित्रमैत्रिणींशी भांडण वाढलं आहे का?

नितांत महाजन

लॉकडाऊन की अनलॉक? बाहेर जायला परवानगी आहे की नाही? जायचं तर केव्हा? कॉलेज तर बंदच. त्यामुळे यंदा कॉलेजात जाऊन कुणी मित्रमैत्रिणी भेटणंही शक्यच नाही. तो/ती स्पेशल भेटणंही अशक्यच. कुणाच्या घरीही जाता येत नाही.कुठं बाहेर, चौकात, घराच्या खाली भेटावं तर तेही थोडाच वेळ, लांब लांब उभं राहून. घरचे बाहेर जाऊ नको म्हणतात. बाहेर गेलं आणि गप्पा मारत राहिलंच उभं तर पोलीसकाका रागवण्याचं भय.एकूण काय दोस्तीत पार व्हिलन बनला आहे हा कोरोना. आता तीन महिने होऊन गेले, तेच सुरूआहे. घरात बसा आणि ऑनलाइन दिसा.पण ऑनलाइन दिसलं की दिसलं की हल्ली भांडणंही सुरूहोत आहेत. ‘इज कोविड चेंजिंग अवर रिलेशनशिप’ याविषयावर अनेकजण अभ्यास करत आहेत. गुगलून पाहत आहेत. तोडगे शोधत आहेत.काहीजणांचं तर म्हणणं आहे की अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत आहे.आणि त्यातून आधीच ताणाचं झालेलं आयुष्य अधिकच तापाचं झालेलं आहे.त्यामुळे ऑनलाइन असणं, दिसणं, बोलणं, न बोलणं, जास्त कमी बोलणं, सोशल मीडियातलं शेअरिंग, कमेण्ट, पोस्ट, फोटो, टाइमपास यातूनही काही तरुण जोडप्यांमध्ये मनमुटाव आणि गैरसमज होत आहेत. हा जास्तीचा ताण लॉकडाऊनच्या काळात कशामुळे वाढतो याची ही एक सोपी यादी.

1) अनेकजण तासन्तास ऑनलाइन असतात, गेम खेळतात, व्हॉट्सअॅप चॅट करतात; पण कुणाला फोन करायला त्यांना वेळ नसतो. खरं तर अनेकजण ते मुद्दाम टाळतात असं नाही; पण तेच ते फोनवर बोलून, एकाच एका माणसाशी बोलूनही काहींना बोअर व्हायला लागलेलं आहे. म्हणून ते फोनकॉल टाळतात, आवश्यक तेवढंच बोलतात. पण त्यामुळे बाकीच्यांचे त्यांच्याविषयी गैरसमज होऊ लागतात.2) काहीजण फोनच उचलत नाहीत. ते बिझी असतात असं नाही; पण त्यांना बोलणंच बोअर झालं आहे, आणि ते शांतपणो त्यांचं काहीतरी करत असू शकतात असं बाकीच्यांना पटत नाही. कामच नाही तर ऑनलाइत तरी दिस असे आग्रह होतात, तेही काहींना कंटाळवाणो वाटू शकतात.3) मोबाइल डेटा मारला की संपतो अशीही अनेकांची तक्रार आहे कारण काहीच काम नसल्याने बरेच जण फक्त डेटा जाळतात, आणि काहीबाही पाहत बसतात.4) अनेकांचा असाही समज आहे की, सध्या जगभरात लोकांना वेळ आहे तर आपण फोन केला किंवा मेसेज केला तर तो बाकीच्यांनी त्वरित उचलायला हवा. फोन अॅन्सर होत नाही, हे काहींना ताणाचं कारण वाटतं आहे.5) मुलींची विशेषत: अपेक्षा असते की जरा रोमॅण्टिक गप्पा त्यानं मारल्या तर बरं; पण त्याला काही सुचत नाही, तेव्हाही भांडण अटळ.6) कॉल वेटिंगवर असणं, तो तासन्तास वेटिंगवर असणं हे अनेकांच्या भांडणाचं मूळ असू शकतं.7) व्हॉट्सअॅपवरचा मॅसेज पाहिल्याच्या निळ्या खुणा दिसतात; पण रिप्लाय येत नाही, यानंही अनेकांचं डोकं फिरतं.8) आपलं सगळं जगणं एका फोनशीच जोडून घेण्याचा त्रस आणि ताणही अनेकांना जाणवतो आहे.