शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा लवकर बुद्धी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:30 IST

जी मंडळं लोकांच्या मदतीला धावतात, त्यांचं कौतुक; पण जे केवळ गर्दी खेचतात त्यांचं काय?

ठळक मुद्देकेवळ डीजे. आरडाओरडा, नृत्य, दंगा या मंडळांना आपण तरी का वर्गणी द्यावी?

 अक्षय सिनकर

नवसाला पावतो, हाकेला धावतो असा हा अमुक-अमुक राजा. अशी चर्चा आता सर्वत्र दिसते. लोकही रांगा लावून दर्शनाला तासन्तास उभे राहतात. मंडळाची स्पर्धा ठीक आहे हो, पण त्या स्पर्धेत बाप्पाला का घेता, असा प्रश्न मनात येतोच.लोकमान्य टिळकांनी सर्वाना एकत्रित आणण्यासाठी, सार्वजनिक सलोखा आणि बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. लोक एकत्र येतील, उत्सवाचा आनंद घेतील व आपल्या समोरील समस्यांवर तोडगा निघेल असंही असेल त्यांच्या मनात; पण आता तसं काही उरलंय का?मंडळाकडूनच ‘आमचा गणपती नवसाला पावतो हं..’ अशी वाक्यं हमखास कानी पडू लागतात. एखाद्या गणपतीला चोवीस-चोवीस तास रांग लावून नंतर त्याच साधं दर्शनसुद्धा होऊ नये असं का होत असेल?अमुकच एक गणपती नवसाला पावतो मग आपला घरचा गणपती आपणच का आणतो? आपण मागितलेलं घरातला गणपती देणार नाही का? मुळात ज्याची मनोभावे पूजा करायची त्याच्याकडेच आपण का मागत राहातो काही ना काही सतत?देव श्रद्धेचा, भक्तीचा  भुकेला आहे. त्याला आपण पैसे आणि सोनं अर्पण करून काय मिळवतो?अकरा दिवसात मोठं मोठय़ा मंडळांकडे खूप रक्कम जमा होते. सामाजिक भान ठेवून काही मंडळं त्या  जमलेल्या रकमेतून सामाजिक उपक्रम राबवले जातात. जसे की रक्तदान शिबिर असो, विद्याथ्र्यासाठी करिअर मार्गदर्शन असो, विविध प्रकारचे व्याख्यान असो अशी असंख्य कामे मंडळांकडून केली जातात. म्हणजे न सांगतादेखील गणपती आपल्यामागे उभा राहतोच की. आता बघाच की, पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरस्थितीत जी मदत मंडळांनी व काही सामाजिक संस्थांसह गणपती मंडळांनी  केली ते याचेच तर उदाहरण आहेत. जे चांगलं काम करतात, त्यांचा आदर्श घ्यावा. त्या मंडळांचं कौतुक करावं. मात्र केवळ डीजे. आरडाओरडा, नृत्य, दंगा या मंडळांना आपण तरी का वर्गणी द्यावी?आपणच विचार करायला हवा.