मेंदूला विचारा, तुला काय आवडतं?
By Admin | Updated: May 14, 2015 19:54 IST2015-05-14T19:54:19+5:302015-05-14T19:54:19+5:30
‘मला नाच करायला खूप आवडतो.’ ‘‘मला गोष्टींची पुस्तकं वाचायला खूप आवडतात,’’ असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काय आवडतं हे सांगत असतो. तसंच ‘मला गणतिं सोडवायला अज्जिबात आवडत नाही त्यापेक्षा मला निबंध लिहायला आवडतात.’ हे ऐकल्यावर एखादा म्हणोल,

मेंदूला विचारा, तुला काय आवडतं?
‘मला नाच करायला खूप आवडतो.’
‘‘मला गोष्टींची पुस्तकं वाचायला खूप आवडतात,’’ असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काय आवडतं हे सांगत असतो.
तसंच ‘मला गणतिं सोडवायला अज्जिबात आवडत नाही त्यापेक्षा मला निबंध लिहायला आवडतात.’ हे ऐकल्यावर एखादा म्हणोल,
‘अरे! मला निबंध लिहायला जमतच नाही, त्यापेक्षा मला गणितं पटापटा सोडवता येतात. ’
असं आपण बोलत असतो तेव्हा आपल्याला काय आवडत नाही आणि काय आवडतं हे सहजपणो सांगत असतो. हे प्रत्येकाच्याच बाबतीत घडत असतं. काही गोष्टी आपल्याला आवड्तात, काही गोष्टी आवडत नाहीत.
असं का होत असेल ?
कारण आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे असतो. आपल्या मेंदूची रचना एकसारखी असली, तरी प्रत्येकात काही वेगळेपणा हा असतोच.
आपला नेहमी पहिल्या पाचात नंबर येतो, किंवा आपल्याला नेहमी ए ग्रेड मिळते याचा अर्थ आपण खूप भारी. खूप हुशार. आपल्याला जगातल्या सगळ्या गोष्टी करता येतील. असं काही मुलं समजतात. तर दुसरीकडे आपल्याला कमी गुण मिळतात, चांगला शेरा मिळत नाही, याचा अर्थ असा अजिबातच नाही की आपण हुशार नाही असं अनेकांना वाटतं!
पण तसं नसतं; आपण धोनीला कुठं विचारतो तुला दहावीला किती परसेण्ट होते, आमीरला कुठं विचारतो की बोर्डात आला होतास का तू?
याचाच अर्थ त्यांची हुशारी वेगळ्या क्षेत्रत आहे हे आपण मान्य करतो.
जे त्यांच्या संदर्भात मान्य करतो, ते स्वत:च्या संदर्भातही करता येऊ शकतं!
कारण निसर्गानं असा कुठलाच मेंदू बनवलेला नाही की जो हुशारच नाही!
आपल्या सर्वांकडे एक चांगला मेंदू असतोच असतो. फक्त प्रत्येक मेंदूची आवड-नावड वेगवेगळी असते.
आणि ती आवड फक्त आपण ओळखली पाहिजे!
त्यासाठी आपल्या मेंदूत आपण डोकावून पहायला हवं, त्यालाच विचारायला हवं की, तुला काय आवडतं?
मेंदूला विचारा
3 प्रश्न
1) आपल्याला कोणती गोष्ट पटकन जमते आणि ती जमल्यावर खूप आनंद होतो?
2) अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला जमावी असं आपल्याला खूप वाटतं, पण त्यासाठी थोडा सराव करावा लागतो.
3) नेमकं असं काय आहे, जे आपण चक्क टाळायला बघतो. नाहीच जमणार आपल्याला असं वाटतं!
-या तीनही गोष्टी आपण सगळेच नेहमी करत असतो. काही गोष्टी आपल्याला सहज जमतात, काही सोप्या गोष्टी जमत नाहीत. जे जमतं तेच काम करणं, हे जास्त सोपं वाटतं. असं का होतं तर आपल्या मेंदूत असलेल्या बुद्धिमत्तेमुळे. आणि ही बुद्धिमत्ता एकाच प्रकाराची नसते.
मेंदूचा सखोल अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. हॉवर्ड गार्डनर म्हणतात की, निसर्गानं प्रत्येक माणसाला आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता बहाल केलेल्या आहेत.
1) भाषिक बुद्धिमत्ता, 2) गणिती बुद्धिमत्ता, 3) संगीतविषयक, 4) निसर्ग विषयक, 5) शरीर/स्नायूविषयक 6) व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता 7) आंतरव्यक्ती, 8) अवकाशीय बुद्धिमत्ता.
याशिवाय खूप अभ्यास केल्यानंतर त्यांनी अजून दोन बुद्धिमत्ता शोधून काढल्या आहेत. त्यातली एक आहे, अस्तित्ववदी अािण दुसरी आहेआध्यात्मिक.
बुद्धिमत्तांची ही नावं कदाचित तुम्हाला आत्ता अवघड वाटतील पण आपल्यापैकी प्रत्येकात यापैकी किमान काही बुद्धिमत्ता असतातच. काही बुद्धिमत्ता ठळक असतात, तर काही अस्पष्ट असतात.
आपल्या करिअरचा निर्णय घेताना आणि आपला कल तपासून पाहताना आपली यापैकी कुठली बुद्धिमत्ता चांगली आहे हे आपण तपासून पाहिलं पाहिजे!
ही बुद्धिमत्ता आणि अॅप्टिटय़ूडचा रिझल्ट यांची सांगड घातली तर गोष्टी खूप सोप्या होतील आणि आपला निर्णयही चूक ठरेल!
बुद्धिमत्ता एकच,
मग कामं का वेगवेगळी!
होतं काय की, अॅप्टिटय़ूड असं सांगतो की तुम्ही इंजिनिअरिंगही चांगलं कराल आणि तुम्ही फॅशन डिझायनिंगही करू शकाल.
चित्रकलाही चांगली आहे, कूकही चांगले ठरू शकता.
ब्युटीपार्लरचं कामही जमेल तुम्हाला.
किंवा मग कौन्सिलर सांगतो,
तुम्ही चांगले खेळाडूही होऊ शकता आणि चांगले नर्तकही.
-अशावेळी कळत नाही की, म्हणजे नक्की करायचं काय? किती टोकाच्या दिशा या?
नेमकं जायचं कुठं?
अशावेळी हे समजून घ्यायचं की, आपली कुठली बुद्धिमत्ता ठळक आहे,आपला कल कुठं आहे हेच ते सांगताहेत.
म्हणजे रिकाम्या जागेत इंजिनिअर घरं बांधू शकतो.इंटिरिअर डिझायनर मोकळ्या घरात उत्तम डेकोरेशनचं प्लॅनिंग करू शकतो. तसंच चित्रकार उत्तम चित्र काढतो, एखादा ड्रायव्हर गाडी चालवताना जागेचा अंदाज घेतो, स्वयंपाक करताना ठरवावं लागतं की कुठले पदार्थ वापरले तर कुठल्या प्रकारचा, चवीचा पदार्थ बनेल असा विचार करतो. यासा:याला म्हणतात अवकाशीय बुद्धिमत्ता. व्हिज्युअलायङोशन करण्याची ताकद!
ही बुद्धिमत्ता चांगली आहे त्यामुळे ती जिथं वापरली जाते ती कामं तुम्ही करू शकता.
मुद्दा एवढाच, निर्णय हाच घ्यायचा की, यातलं कुठलं काम करायला आपल्याला आवडेल!
कुठलं आपल्याला ङोपेल, करता येईल हे तपासून पहायचं!
टेस्ट करा
पण हे लक्षात ठेवा.
1) एकावेळेस एकाच कौन्सिलरकडे जा, उत्तम प्रोफेशनल कौन्सिलर शोधा.
2) जी टेस्ट कराल ती प्रामाणिकपणो करा, खरी-मनापासून उत्तरं द्या. कारण चुकीची उत्तरं म्हणजे चुकीचा रिझल्ट.
3) सगळ्यात महत्वाचं नुस्त्या टेस्ट करु नका, त्यापेक्षा समुपदेशन घ्या. योग्य सल्ला मागा आणि त्या सल्लयाचा गांभिर्यानं विचार करा.
4) एकावेळी खूप एक्सपिरीमेण्ट करू नका. सगळंच करून पाहू असं म्हणत प्रयोग करण्यापेक्षा जे सगळ्यात जास्त आवडतं तेच फोकस करा.
5) अनेक गोष्टी शिकणं वेगळं आणि आपल्याला ज्यात करिअर करायचं ते करणं वेगळं. त्यामुळे काम म्हणून आपल्याला काय करायला आवडेल ते शोधा.
6) पालक म्हणतात म्हणून जे आपल्याला करायचं नाही, ते करण्याचे किती चान्सेस आहेत ते शोधत बसू नका. त्यापेक्षा जे चांगलं जमेल असं वाटतं, ते करताना पालकांना शांतपणो विश्वासात घेता येईल का हे पहा.
आईबाबा, एवढं कराल?
1)आपल्या मुलाच्या भल्याचाच निर्णय आपण घेतो हे खरं पण त्याचा कल नसेल तर निव्वळ टेस्ट करुन तसा निर्णय येणार नाही. त्याला भरीस पाडण्यात हाशील नाही कारण पुढे तो त्या क्षेत्रत फार काही प्रगती करू शकणार नाही.
2) त्यापेक्षा दबाव न वाढवता जे मुलांना करायचंय ते करू द्या,पण स्पष्ट सांगा की, हे शिक्षण अर्धवट सोडता येणार नाही. ते तुला गांभिर्यानं तुङया जबाबदारीवरच करावं लागेल.
3) सगळ्यात महत्वाचं महागडय़ा फिया भरून अॅडमिशन मिळवाल, पण आवडत नसलेलं शिक्षण डोक्यात भरता येणार नाही.