अनुष्काचा समर लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 20:19 IST2018-04-27T20:19:19+5:302018-04-27T20:19:19+5:30
प्रख्यात फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी हा ट्रॅडिशनल कपड्यांना एक वेगळा भारदस्तपणा आणि ग्लॅमरस लूक देण्यात निपुण आहे.

अनुष्काचा समर लूक
- श्रुती साठे
असा लूक आपल्याला शोभेल का? कपडे कॉन्ट्रास्ट असावेत की मॅचिंग? असा प्रश्न आपल्याला सारखा पडत असतो. सलवार-कुर्ता किंवा पॅण्ट आणि टॉप सगळं एकाच रंगाचं घातलं तर एकाच ताग्यातून शिवलंय की काय? अशा प्रश्नार्थक नजरांनी लोक आपल्याकडे पाहतात.
पण प्रख्यात फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी हा ट्रॅडिशनल कपड्यांना एक वेगळा भारदस्तपणा आणि ग्लॅमरस लूक देण्यात निपुण आहे.
त्याचे डिझाइन्स आणि सेलिब्रिटीच्या फिगर आणि ग्लॅमर हे सारं म्हणजे अनेकांसाठी आदर्श. तेच तरुणींसाठी फॅशन गोल्स ठरतात. मग तो अनुष्काचा लग्नातला लेहंगा असुदे, बरगंडी रंगाची साडी असुदे आणि आता स्टार प्रिंटेड पांढरा पलाझो आणि कुर्ता असुदेत. अनुष्का मध्यंतरी स्टार प्रिंट कुर्ता, पलाझो आणि त्याच प्रिंटची ओढणी अशा ड्रेसमध्ये फार सुंदर दिसली. ओढणीला लावलेल्या काळ्या रंगाच्या टॅसल्सही त्या आॅल ओव्हर स्टार प्रिंटला शोधून दिसल्या.
अनुष्कासारखा समर लूक मिळवायचा असेल तर हलके आणि नाजूक पोल्का डॉट्स, स्टार प्रिंट, छोटे फ्लोरल प्रिंट्स यांची निवड करायला हवी. कपड्याचा बेस, कलर मात्र सोबर आहे ना, याची काळजी घ्या. पांढरा, आॅफ व्हाइट, पिस्ता, आकाशी निळा, लाइट पिंक, लाइट लव्हेंडर हे समर कलर अतिशय सुरेख दिसतील. याशिवाय एक सोप्पा आणि कम्फर्टेबल पर्याय म्हणजे प्लेन काळा किंवा पांढरा कुर्ता आणि लेगिंग्स आणि त्याला एखादी कॉन्ट्रास्ट कलमकारी, एम्ब्रॉयडरी केलेली किंवा बांधणीची ओढणी किंवा जॅकेट हादेखील हे सुटसुटीत पर्याय होऊ शकेल.
असा कॅज्युअल लूक कायमच फ्रेश दिसतो. कुठले कपडे घालू? असा प्रश्न असेल तेव्हा या रंगांची निवड करणं उत्तम. पार्टी, एअरपोर्ट, डे आउटिंग, आॅफिस या सर्व ठिकाणी तुम्हाला ट्रेण्डी दिसण्यास हे कॉम्बिनेशन मदत करेल.
२ं.२ँ१४३्र@ॅें्र’.ूङ्मे