अमेरिकन विद्यार्थी म्हणतात,गरज काय आहे,भारतीय भाषा शिकण्याची?

By Admin | Updated: February 26, 2015 21:26 IST2015-02-26T20:51:59+5:302015-02-26T21:26:19+5:30

‘तरुण’ भारतीय बाजारपेठेचे ढोल जगभर कितीही वाजत असले तरी, आपल्या भाषेत बोलायला जग तयार नाही; असं का?

American students say, what is the need, learning Indian language? | अमेरिकन विद्यार्थी म्हणतात,गरज काय आहे,भारतीय भाषा शिकण्याची?

अमेरिकन विद्यार्थी म्हणतात,गरज काय आहे,भारतीय भाषा शिकण्याची?

>‘तरुण’ भारतीय बाजारपेठेचे ढोल जगभर कितीही वाजत असले तरी, आपल्या भाषेत बोलायला जग तयार नाही; असं का?
 
आपणच जर ‘आपल्याला’ भाव देणार नसू, येताजाता स्वत:ला कमी लेखणार असू, तर जग आपल्याला किंमत देईल का?
नाहीच देणार, हे साधं व्यवहार ज्ञान आहे! 
सध्या जगात आपल्या भाषांच्या संदर्भात हेच घडतं आहे. अमेरिकेत एक संस्था आहे, मॉडर्न लॅँग्वेज असोसिएशन.  या संस्थेनं अलीकडेच एक अभ्यास केला. निमित्त होतं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या भारत भेटीचं! एकीकडे भारत ही जगातली मोठी बाजारपेठ, भारतीय अर्थव्यवस्थेची जलद होणारी वाढ, अमेरिका आणि भारतातले सुधारत चाललेले आर्थिक-राजकीय संबंध, अमेरिकन उद्योगांना भारतात उपलब्ध होणारं स्वस्त मनुष्यबळ आणि भारतीय माणसांनी अमेरिकेत जाऊन तिथल्या उद्योगधंद्यात, व्यवसायात दाखवलेली चुणूक, अमेरिकन विद्यापीठात वाढलेला भारतीय टक्का या सा:यांविषयी भरपूर चर्चा होत आहे. भारत नावाच्या या देशाविषयी त्यामुळे अमेरिकन तरुणांना उत्सुकता वाटून भारतीय भाषा विशेषत: हिंदी भाषा शिक्षणाकडे अमेरिकन विद्याथ्र्याचा कल वाढतो आहे का असा एक अभ्यास नुकताच करण्यात आला. भारतीय भाषाच नाही तर अमेरिकन विद्याथ्र्याचा ओढा कुठल्या परदेशी भाषा शिक्षणाकडे आहे याविषयी त्यांनी एक सव्रेक्षण केले.
त्यात त्यांना  स्पष्ट आढळून आले की, अमेरिकन कॉलेज आणि विद्यापीठात शिकणा:या बहुसंख्य मुलांना भारतीय भाषा शिकण्यात काहीच रस नाही. त्यापेक्षा ते अरबी, मॅँडरिन (म्हणजेच चिनी) आणि कोरिअन भाषा शिकत आहेत. या तीन भाषांकडे अमेरिकन विद्याथ्र्याचा सर्वाधिक ओढा आहे. हे सव्रेक्षण करणा:या  सिनिअर फेलो अलिसा आयरेस सांगतात, ‘‘9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकन विद्याथ्र्याना वाटू लागलं की आपण अरबी शिकायला हवी तरच त्या जगात काय चाललंय हे आपल्याला कळेल. दुसरीकडे चीन, जपान, कोरिया या देशातही बाजारपेठ आणि उद्योग यांच्या वेगवान वाढीमुळे त्या देशांशी संपर्क वाढला, त्यातून त्यांची भाषा शिकण्याची गरज या विद्याथ्र्याना वाटू लागली. भारतासंदर्भात अशी निकडच वाटत नसल्यानं अमेरिकन विद्यार्थी भारतीय भाषा शिकत नाहीत. आजच्या घडीला सर्व अमेरिकेत किती मुलं भारतीय भाषा शिकताहेत?
तर सर्व भारतीय भाषांचा एकत्र विचार केला तरी ही संख्या चार हजारांहून जास्त नाही!’’
- हे सगळं वाचताना कितीही त्रस झाला तरी हे वास्तव आहे. आपलंच आपल्या भाषांवर प्रेम नाही, आपण आपल्या भाषा प्रेमानं बोलत नाही, त्या भाषेत व्यक्त होत नाही, आपलीच भाषा आपण उत्तम शिकत नाही तर जगानं ती भाषा शिकावी असं वाटणं हा शेखचिल्लीपणा आहे.
त्यामुळं निव्वळ त्रगा करून किंवा गर्व से कहोचे नारे देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत.
आपण आपल्या भाषांवर प्रेम केलं, आपल्या भाषेत बोललो, आपल्या भाषांमधली ताकद जगाला पटवून दिली तर लोकं आपली भाषा शिकतील.
नाही तर त्यांनी तरी कशाला आपल्या भाषा शिकाव्यात?
- नाही का?
 
 
 
कुठली भाषा, किती विद्यार्थी शिकताहेत?
 
हिंदी- 1800
हिंदी-उर्दू- 533
उर्दू- 349
पंजाबी- 124
तमिळ- 82
बंगाली- 64
तेलगू- 52
मल्याळम- 44
नेपाळी- 27
गुजराथी- 6
कन्नडा- 5
आणि
मराठी- (फक्त) 5
 
2009 मधे
अमेरिकेत भारतीय भाषा
शिकणारे विद्यार्थी होते,
फक्त 3,924
 
2013 मधे
उरले फक्त 3,090
 
 सर्वाधिक अमेरिकन विद्यार्थी 
शिकत असलेल्या चार महत्त्वाच्या भाषा
1) कोरिअन
 2) अमेरिकन साईन लॅँग्वेज
3) पोतरुगिज
4) चिनी
 
अमेरिकन विद्यार्थी कुठल्या भाषा सर्वाधिक शिकतात?
स्पॅनिश- आठ लाखांहून अधिक विद्यार्थी ही भाषा शिकतात.
फ्रेंच- दोन लाखांहून अधिक विद्यार्थी सध्या फ्रेंच शिकतात.
 
जपानी-चिनी-कोरिअन
किती जण शिकतात?
 
67,क्क्क् मुलं जपानी शिकतात.
61,क्क्क् हून जास्त चिनी शिकतात.
12,क्क्क् हून जास्त कोरिअन भाषा शिकतात.
या तीन भाषा शिक्षणामुळं ज्या संधी उपलब्ध होतील, तेवढय़ा संधी भारतीय भाषा शिकून मिळणार नाहीत, असं अमेरिकन विद्याथ्र्याना वाटतं.
मुख्य म्हणजे या देशांत शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आपल्याला जावं लागेल असंही अमेरिकन विद्याथ्र्याना वाटतं. जगभरातल्या कुठल्या देशात भविष्यात तुम्हाला जावं लागण्याची शक्यता आहे असं विचारलं तर उत्तरं म्हणून आलेल्या टॉप टेन देशांत भारताचा समावेश नाही
 

Web Title: American students say, what is the need, learning Indian language?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.