शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

अंब्रेला- ही शॉर्टफिल्म पाहिली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:37 IST

पैसे फेका नि सेवा घ्या असं नव्या जगण्याचं चक्र. पण मग त्या चक्रात फिरणार्‍या माणसांच्या मनात, जगात कधी डोकावणार आपण?

ठळक मुद्दे वरवर असंवेदनशील वाटणार्‍या या वास्तवाच्या आत मात्र हाडामासाचं एक जग आहे, एक गोष्ट आहे. ती समजून घेण्याची उसंत आपल्याला आहे का, हा प्रश्न आहे. 

- माधुरी पेठकर

सध्या आपलं जगणं खूप धावपळीचं झालंय. कोणाला कोणाकडे बघायला फुरसत नाही. त्यात रोज वाढत जाणारे व्याप जरा म्हणून उसंत घेऊ देत नाही. त्यानं हाडामासाच्या माणसांचं पार यंत्र केलंय. वरवर असंवेदनशील वाटणार्‍या या वास्तवाच्या आत मात्र हाडामासाचं एक जग आहे, एक गोष्ट आहे. ती समजून घेण्याची उसंत आपल्याला आहे का, हा प्रश्न आहे.  ‘अवधूत’ ही उसंत घेतो. एका फूड डिलेव्हरी बॉयशी तो भरपावसात थांबून बोलतो. त्याला हवा असलेला रस्ता दाखवतो आणि त्याला उपयोगी पडेल न पडेल यांचा अंदाज नसताना भरपावसात कस्टमरचं घर शोधत फिरणार्‍या त्या डिलेव्हरी बॉयला आपल्या हातातली छत्री देतो. ओल्या काळजाचा हा अवधूत भेटतो तो  ‘अंब्रेला’ या शॉर्ट फिल्ममध्ये. मुंबईतल्या भर पावसातल्या रात्री अवधूत कानात इअर फोन अडकवून, हातात छत्री धरून आपल्या रूमवर चाललेला असतो. कानात गाण्याचा आवाज आणि सभोवताली कोसळणारा पाऊस. तेवढय़ात आपल्याला मागून कोणीतरी हाका मारतंय, हे अवधूतच्या लक्षात येतं. तो मागे वळतो. थांबतो. त्याच्यासमोर भांबावलेला डिलेव्हरी बॉय उभा असतो. त्याला मुंबईच्या गल्ल्यांमध्ये हरवलेला एक पत्ता हवा असतो. एक तासापासून पत्त्याअभावी भरपावसात खोळंबलेला हा डिलेव्हरी बॉय. कस्टमरने 15  मिनिटात मागवलेली ऑर्डर एक तास उलटूनही त्याच्याचकडे पडून असते. पत्ता सापडत नाही म्हणून माघारी फिरलं तर हॉटेलमालक कच्चा खाईल ही भीती आणि पत्ता सापडूनही ग्राहक शिव्या घालील ही धास्ती. पण त्याला दुसराच पर्याय योग्य वाटतो. म्हणून भरपावसात कोणी फिरकायलाही तयार नसलेल्या वाटेवर तो तासभर थांबून राहातो. त्या वाटेवर त्याला अवधूत भेटतो. अवधूत त्याला पत्ता तर सांगतोच; पण पावसानं आणि पत्ता सापडत नसल्याच्या भीतीनं थिजून गेलेल्या त्या डिलेव्हरी बॉयची तो काळजीनं आणि आपुलकीनं चौकशीही करतो.बोलण्यात भोजपुरी झाक असलेला तो डिलेव्हरी बॉय बिहारमधल्या सिवान गावातला. तिकडे घरी आई-वडील आणि तीन लहान भावंडं असलेला तो काम शोधत मुंबईत आलेला. कामाला लागून पाच दिवसच झालेल्या या मुलाला तिकडे गावाकडे पैसे पाठवण्याची चिंता लागलेली. पण अजून पगाराला 25 दिवस बाकी असतात ही त्याची व्यथा. पगार म्हणून महिन्याच्या शेवटी त्याला अवघे 2200 रुपये मिळणार असतात. पण खाण्याराहण्याची सोय हॉटेलमालकानं केलेली असल्यानं स्वतर्‍कडे अवघे 200 रुपये ठेवून गावाकडे 2000 रुपये पाठवण्याची त्याची तयारी असते. आपल्यापेक्षा गावाकडे असलेल्या पाच माणसांची गरज मोठी असते. या गरजेची जाणीव अवधूतशी बोलताना त्याच्या डोळ्यातून वाहत असते. अवधूत सुन्न होतो. आपली छत्री त्याच्याकडे सोपवून भिजत रूमवर पोहोचतो. इकडे रूममेट फोनवर खाण्याची ऑर्डर देऊन जेवण घेऊन येणार्‍या  डिलेव्हरी बॉयची चडफडत वाट पाहात असतो. तोंडानं लाखोली वाहात असतो. अवधूत त्याला भेटलेला डिलेव्हरी बॉयचा अनुभव मित्राला सांगतो. जेवण घेऊन येणार्‍या डिलेव्हरी बॉयची खटीया खडी करू इच्छिणार्‍या त्या मित्राला डिलेव्हरी बॉयकडे बघण्याची एक माणुसकीची नजर भेटते.ही माणुसकीची नजर प्रेक्षकांर्पयत पोहोचविण्यासाठीच प्रियशंकेर घोष आणि त्याचा मित्र कुंदन रॉय यांनी 11 मिनिटांची  ‘अंब्रेला’ ही हिंदी शॉर्ट फिल्म बनवली. एकदा मुंबईच्या गर्दीत बसमधून उतरल्यावर कुंदनला असाच एक डिलेव्हरी बॉय भेटलेला. कुंदननं हा अनुभव प्रियशंकेरला सांगितला. प्रियशंकेरला हा अनुभव फिल्मद्वारे मांडावासा वाटला. मित्रांची गॅँग जमवली. ज्या कंपनीत काम करत होता तिथला कॅमेरा घेऊन शूटिंग करायचं ठरवलं. महिनाभर मग सकाळी 9 ते 6 डय़ूटी आणि पुढे मग रात्रभर फिल्मच शूटिंग.  रट्टा मारू शिक्षणात टप्पा खाल्लेला  प्रियशंकेर फिजिक्सचा नाद सोडून मास कम्युनिकेशनच्या मार्गावर आला. तिथे फोटोग्राफी शिकला. मग एका कंपनीत लागला. फूड फोटोग्राफी करू लागला. पण काम आवडीचं असलं तरी रूटीन मात्र रटाळ वाटू लागलं. या रूटीनमधून बाहेर पडण्याची संधी त्याला  ‘अंब्रेला’या फिल्मनं दिली. ***   ‘अंब्रेला’ ही हिंदी शॉर्ट फिल्म या लिंकवर पाहता येईल.

https://www.youtube.com/watch?v=NrIpXkuusus