आलियाचा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 08:55 IST2018-05-24T08:48:53+5:302018-05-24T08:55:34+5:30

आलिया सिनेमाच्या प्रमोशनसाठी जसा साधा, सुटसुटीत लूक निवडते त्यातली खासियत काय आहे?

alia bhatts look and style statement during movie promotion | आलियाचा लूक

आलियाचा लूक

- श्रुती साठे
sa.shruti@gmail.com

काही सेलिब्रिटीज आपल्यातल्याच एक वाटतात..
आलिया भट ही त्यातलीच एक!
तिचा निरागस चेहरा, मध्यम उंची, लहान बांधा, काळे केस यामुळे ती अगदी द गर्ल नेक्स्ट डोअर वाटते. कुठल्याही कॉलेजच्या थव्यात मिसळून जाईल अशी! असं वाटण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिचं साधं सोप्पं स्टायलिंग!
राझी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावताना आलियाने अगदी सुटसुटीत वेस्टर्न ड्रेसेसची निवड केली. पावडर ब्लू म्हणजेच फिकट ब्लू कलरच्या सिल्क शिफॉन ड्रेसमध्ये आलिया सुरेख दिसली. लांब बाह्यांचा हा लेअर ड्रेस. त्याला समोर असलेल्या चुण्या/रफल्समुळे उठून दिसला. त्याच्या जोडीला वापरलेले मॅचिंग निळ्या रंगाचे मेटॅलिक सॅण्डल्सही शोभून दिसले.
काळ्या बेसवर मरून हार्ट प्रिंट ड्रेस आलियाने सहज कॅरी केला. व्ही- नेक आणि फुल स्लीव्हज असलेला हा मिनी ड्रेस आलियावर खुलून दिसला. या ड्रेसला शोभतील असे ब्लॅक स्ट्रॅपी सॅण्डल्स तिनं निवडले.
सोशल मीडियावर चर्चा झाली ती आलियाच्या आॅफव्हाइट ड्रेसची. बारीक मेश (जाळी) असलेला हा ड्रेस त्याच्या गुलाबी आणि काळ्या बारीक फुलांच्या अ‍ॅप्लिक वर्कमुळे खास उठून दिसला. व्ही शेप गळा आणि त्याभोवतीला असलेले रफल्स यामुळे हा ड्रेस सुंदर दिसत होता. आलियाने आपला लूक पोनीटेल, लाइट मेकअप आणि न्यूड स्ट्रॅपी सॅण्डल्स वापरून पूर्ण केला.
तुम्हाला आलियाचा कुठला लूक सगळ्यात जास्त आवडला? तो तसा कॉपी करताना त्यातला सुटसुटीतपणा आणि सहजता मात्र लक्षात घ्या.

 

Web Title: alia bhatts look and style statement during movie promotion