चौकस आणि भोचक

By Admin | Updated: May 7, 2015 17:29 IST2015-05-07T17:29:09+5:302015-05-07T17:29:09+5:30

स्पून फिडिंग बंद करून, स्वत:चं डोकं वापरणा:यांनाच या नव्या वाटा दिसतील !

Alert and frightening | चौकस आणि भोचक

चौकस आणि भोचक

हे करिअरच नवे.
 
1) ही सारी नवीन करिअर्स आहेत. आपण ज्याला फ्यूचर जॉब्ज म्हणतो.
म्हणजे आज यातली काही कामं अस्तित्वात आहेत. पण येत्या पाच-दहा वर्षात यातली अनेक कामं अधिक ठळकपणो समोर येतील.
2) ही सारी कामंच नव्या लाइफस्टाइलने आणि तंत्रज्ञानानं जन्माला घातली आहेत. म्हणजे कल्पना करा जेव्हा मल्टिप्लेक्सच नव्हते तेव्हा त्यांचे स्क्रिन पुसणारी माणसं असण्याची काही शक्यताच नव्हती. तेच स्मार्ट फोनचं. त्यावर अॅप्स आले म्हणून अॅप डेव्हलपर आले. काळाप्रमाणं माणसांची गरज बदलतेय तसतशी ही कामं तयार होत आहेत. 
3) त्यामुळे डॉक्टर, इंजिनिअर, वकील होण्याचे जे रेडिमेडे कोर्सेस असतात तसे रेडिमेड कोर्सेस या सगळ्या करिअरचे आज तरी तयार नाहीत. मात्र त्याच्यासाठीच्या बेसिक पदव्या मात्र आपल्याकडे मिळताहेत. अगदी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. ते पत्रकारिता ते तमाम इंजिनिअर, आयटीवाले, एमबीए यासा:या पदव्या आपल्या प्रवासाची पुढची पायरी म्हणूनच वापरायच्या आहेत.
4) नाकासमोर काम आणि घडय़ाळाच्या काटय़ावर काटा काम या दोन्ही गोष्टींना या नव्या फिल्ड्समध्ये काही थारा नाही. 
5) स्वत:चं डोकं वापरून तुम्ही नवीन काय करतात याच एका तत्त्वावर या कामांचा डोलारा उभा राहतो आहे तीच पहिली अट, तुम्ही वेगळं काय करणार?
 
मेक इन इंडियाचं नवं वारं
 
देशात मेक इन इंडियाचे नवे वारे आहेत आणि नवे नारेही आहेत. या सा:यात आपल्याला असा प्रश्न पडतो की, आपल्याला या सगळ्याचा काय फायदा?
खरं तर या प्रश्नापेक्षा महत्त्वाचा प्रश्न की, आपण या नवीन वा:याचा कसा फायदा करून घेणार?
त्यासाठी आपण काय प्रय} करणार?
तोही माहितीचा प्रचंड पूर आपल्या आसपास आलेला असताना?
त्यासाठी दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत!
1) हे मनातून काढून टाकायचं की फक्त बडय़ाबडय़ा शिकलेल्या आणि हायफाय इंग्रजीवाल्यांनाच काम आहे आणि लठ्ठ पगाराच्या नोक:या आहेत. तसं अजिबात नाहीत. उलट आता ज्यांच्याकडे ‘लो-स्किल’ म्हणून पाहिलं जातं त्याच कामांना येत्या काळात प्रचंड डिमाण्ड असणार आहे. लोकांना प्लंबर, इलेक्ट्रिशियन मिळणार नाही. जगात सर्वाधिक महत्त्वाचे आणि दुर्मीळ होत चाललेल्या कामात या दोन कामांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या हातात स्किल असलं पाहिजे आणि नव्या स्मार्ट पद्धतीनं ते वापरता आलं पाहिजे हे एक तत्त्व शिकलं तर येत्या काळात छोटय़ा स्किलबेस कामांना प्रचंड मागणी असेल!
स्किल, स्मार्टनेस आणि कम्युनिकेशन ही तीन महत्त्वाची सूत्रं मात्र विसरायची नाहीत.
2) अनेक विदेशी कंपन्या आपल्या देशात गुंतवणूक करत आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट उभे राहत आहेत. त्यांना मनुष्यबळ लागेल, पण त्यांना लागणा:या ‘लायक’ मनुष्यबळात आपला समावेश व्हावा म्हणून आपल्यालाच हातपाय हलवावे लागतील. सतत स्वत:ला अपडेट ठेवावं लागेल, आपलं स्किल पक्कं लागेल आणि वेगळ्या वाटा शोधून त्यानुसार कामंही करावं लागेल!
 
ठोकळ्यांना नकार, क्रिएटिव्हिटीला संधी
 
ही सगळी करिअर वाचा, अगदी अति टेक्निकल कामं जरी असली तरी ती नीट वाचा. यासगळ्यात क्रिएटिव्ह भेज्यांना वाव आहे. टिपिकल कामं करणारी माणसं नको आहेत. इंजिनिअरला समाजमन कळायला हवं आणि डॉक्टरला रोबोट सायन्स. 
हे वाटतं तितकं सोपं नाहीच. मात्र चौकट आणि भोचक माणसांना मात्र चांगले दिवस येतील असं एकूण आता चित्र आहे.
 
वाचलात सगळा अंक?
एखादं करिअर वाचून असं वाटलं असेल की, बास; हेच आपलं काम!
हेच मी आता करणार?
लगेच फोन लावाल, 
लगेच विचाराल ऑक्सिजनला की,
याचा कोर्स कुठं असतो?
कॉलेजची नावं, कोर्सचं नाव असं सगळं का नाही छापलं?
आता फोन नंबर द्या, पत्ता द्या.
प्रवेश फी किती असते?
पण हे सारं विचारण्याआधी काही गोष्टी समजून घ्या.
नव्या जगात नव्या करिअरच्या वाटा शोधताना जुना आणि जुनाटही 
मार्ग नाही कामाला येणार,
आपल्याला आपलं डोकंच चालवावं लागेल!
आणि ते चाललं तरच या नवीन वाटांचा विचार केलेला बरा;
नाहीतर आपली जुनाट चाकोरी बरी; मळलेल्या वाटेवरचा फुफाटाच बरा मग!
ते नकोय ना;
मग काही गोष्टी घोकून पाठ करून ठेवलेल्या ब:या.
म्हणून या काही गोष्टी प्लीज लक्षात ठेवा.
माहिती मागू नका; शोधा!
 
1)आपल्याला सवय झाली आहे, पुस्तकातून घोकायचं, ओकायचं. स्वत:चं डोकंच चालवायचं नाही. त्यामुळे खरं तर आपण मागे पडतो.
2) आता हेच पहा, अशी भन्नाट करिअर असतात हे आपल्याला आज कळलं, पण लगेच आपण विचारणार, कोर्स सांगा, कॉलेज सांगा.
3) खरं तर त्याउलट आता आपण असं करायला हवं की, एक छोटासा धागा मिळाला ना, त्याचा हात धरून आपण स्वत:च आपली माहिती शोधायला हवी.
4) लगेच पुढचा प्रश्न, ही माहिती कोण देणार? खरं तर अनेक गोष्टींची माहिती नेटवर एका क्लिकवर उपलब्ध आहेत. आपण आपला आवडीचा विषय शोधून ती माहिती कशी शोधायची हे शिकून घेतलं पाहिजे.
5) आणि ती शिकायची तर फेसबुक, व्हॉट्सअॅप पलीकडे आपल्याला इंटरनेटचा वापर करता यायला हवा.
6) वर्तमानपत्रं-पुस्तकं वाचायला हवीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जे करायचं त्यावर फोकस हवा. 
अॅटो अपडेट व्हा!
1) एक करिअर घ्या, त्याची सगळी माहिती गूगलवर मिळेल. त्यासाठी काय काय शिकावं लागेल हे कळेल, जगभरात त्या विषयात काय काय काम चाललंय हेसुद्धा कळेल.
2) फक्त शोधायला हवं. अनेक साइट्स तुमच्याकडे बूकमार्क करून ठेवा.
3) अनेक ठिकाणी अॅटो ई-मेल आणि अपडेटची सोय असते. तिथं एकदाच फक्त स्वत:ला रजिस्टर करून ठेवा की, त्या त्या विषयातली सगळी माहिती तुमच्या इनबॉक्समधे येऊन पडेल.
4) सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे शिकतोय, त्या बेसिक डिग्रीच्या पलीकडे जाऊन ही कामं आहेत. त्यामुळे आपण जर पदवी घेतली असेल तर त्यापुढे काय कसं शिकायचं हे आपलं आपणच शोधायला हवं.

 

Web Title: Alert and frightening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.