शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अ‍ॅलेक्झा उगाच का हसली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 3:49 PM

मार्क झूकेरबर्गला एआयची भीती वाटत नाही, मात्र अलीकडेच फेसबुक एआय प्रयोगशाळेत दोन रोबोट्स आपआपसात अनाकलीय भाषेत बोलू लागले. तिकडे ती अ‍ॅलेक्झा अकारण हसत सुटली ही कृत्रिम बुद्धिमान यंत्रं अशी का वागू लागली?

ठळक मुद्देफेसबुक एआय प्रयोगशाळेत अलीकडेच दोन रोबोट्सवर प्रयोग चालला होता. त्यात ते एआय रोबोट अचानक अनाकलनीय भाषेत बोलायला लागले व फेसबुकच्या संशोधकांना तो प्रयोग बंद करावा लागला!

-डॉ. भूषण केळकर

इंडस्ट्री 4.0 चे महत्त्वाचे 9 भाग आपण समजावून घेतले. आता पुढील भागापासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील त्याचा परिणाम व आपण स्वतर्‍च्या करिअरसाठी करायचे उपाय  बघणार आहोत. इंडस्ट्री 4.0 मधील जो  एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी आपण तपशिलात बोललो आहोत.त्याच संदर्भातल्या या अलीकडच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील.* आयआयटी मुंबईतर्फे ‘धारावी’मध्ये एआय आधारित चॅटबॉक्स लागले.* कॅन्सरचं निदान करण्यासाठी एआयची मदत! * फेक न्यूजवर नियंत्रण आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरणार एआय! भारत सरकारची मागणी.* एआय संशोधनासाठी भारताचे बौद्धिकसंपदा नियम अधिक सुलभ होणार!* भारतातील व्यावसायिक यशात मायक्रोसॉफ्ट एआयवर लक्ष केंद्रित करणार!* स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा यांचे मोठय़ा प्रमाणावर एआय वापरण्याचं सूतोवाच!आता सांगा, हे काय आहे? मित्र-मैत्रिणींनो, केवळ गेल्या आठवडय़ातल्या इंडस्ट्री 4.0 च्या एआय संदर्भातल्या या बातम्या. त्याची व्याप्ती तरी कशी? आरोग्यापासून सामाजिक आणि व्यापारापासून ते बँकिंग क्षेत्रार्पयत. सर्वव्यापी आणि अत्यंत वेगवान.या सर्वव्यापकतेत आणि वेगामध्ये नुसताच संगणक प्रणालीमधला बदल  हे विलक्षण प्रगतीचं कारण नाही; तर ज्यांना कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणतात तेसुद्धा वेगाने प्रगती करतंय. हेच बघा ना की आयबीएमने एक कॉम्प्युटर आणलाय जो आपल्या नखावर मावेल एवढा आहे. म्हणजे हे संगणक वेगवान, कार्यक्षम तर होत आहेतच पण आकारमानात विलक्षण छोटेपण होत आहेत!या इंडस्ट्री 4.0 मधल्या तंत्रज्ञानाने आपल्या जीवनातील अनेक अंग/करिअर्सवर होणारे परिणाम वेगवान आहेत. मात्र त्याविषयी बोलण्यापूर्वी या लेखात मला मुद्दाम उल्लेख करायचाय तो या तंत्रज्ञानाविषयी प्रख्यात तंत्रज्ञ/शास्त्रज्ञांनी  सावधान राहण्याच्या गरजेबद्दल दिलेला इशारा.प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी असं म्हटलंय की मनुष्याची उत्क्रांती ही जैवशास्त्रीय नियमांनुसार आणि म्हणून धिमी आहे; परंतु या कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्समध्ये उत्क्रांतीचा वेग हा अत्यंत जास्त असल्याने अशी शक्यता आहे की यंत्रं मानवापेक्षाही पुढे उत्क्रांत होतील. त्यात मानवाच्या अस्तित्वाला धोका आहे. त्यावर उपाय म्हणून हॉकिंग यांनी मानवाला अंतराळप्रवास व मंगळ आदी ग्रहांवर पर्यायी वास्तव्य हे उपायसुद्धा सांगून ठेवलेत! म्हणजे पुढील काळात ‘पत्रिकेत मंगळ नाही’ पण आमंत्रण पत्रिकेत मंगळ असू शकेल! मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनाही एआय धोका असू शकतो याची जाणीव आहे आणि ते सार्वजनिकपणे व्यक्तपण करत असतात.रस्रूंी7 आणि ळी2’ं चे जनक इलॉन मस्क व फेसबुकचा जनक मार्क झूकेरबर्ग, या दोन प्रगल्भ व प्रतिभावंत तंत्रज्ञांमधील तात्त्विक वाद हा प्रसिद्ध आहे.मार्क झूकेरबर्ग यांना एआय हे वरदान वाटतं आणि त्यात काही गंभीर धोका आहे असं त्यांना वाटतच नाही. त्यांच्या मते, एआय किंवा इंडस्ट्री 4.0 ला जणू ते काही ए1ंल्ल‘ील्ल23ी्रल्ल राक्षस असं मानणं हे निखालस चूक आहे. एआयमुळे मानवाचा संपूर्ण फायदाच त्यांना वाटतो.इलॉन मस्क यांचं मत स्टीफन हॉकिंग व बिल गेट्स प्रमाणेच काळजीचं आहे. त्यांनी तर ओपन एआय नावाच्या प्रणालीसाठी 100 कोटी डॉलर्स दिले आहेत; की ज्यात एआयचा संतुलित व संयमित वापर संशोधक होईल.जो मार्क झूकेरबर्ग एआयची भीतीबद्दल हसण्यावारी नेतो, त्याच्याच फेसबुक एआय प्रयोगशाळेत अलीकडेच दोन रोबोट्सवर प्रयोग चालला होता. त्यात ते एआय रोबोट अचानक अनाकलनीय भाषेत बोलायला लागले व फेसबुकच्या संशोधकांना तो प्रयोग बंद करावा लागला!परवाच वाचनात आलं की अ‍ॅलेक्झा ही एआय आधारित असिस्टण्ट कारण नसताना हसायला लागली! कारण नसताना बायको हसायला लागली तर नवर्‍यांची गाळण उडते या स्वानुभवाने मी एकूणच एआयचा धोका हसण्यावारी नेण्याचा नाही हे समजतो.