अपघाताचे 75,000 तरुण बळी

By Admin | Updated: September 24, 2015 15:10 IST2015-09-24T15:10:35+5:302015-09-24T15:10:35+5:30

गेल्या वर्षभरात देशभरातील अपघातांनी 15 ते 34 वर्षे वयोगटातील तब्बल 75 हजार युवकांचे प्राण घेतलेत. भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रलयाच्या परिवहन संशोधन शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या 2014 च्या रस्ते अपघात अहवालाची ही आकडेवारी. आणि त्यातही 53% बळी 15 ते 34 या वयोगटातील आहेत. ऐन तारुण्यातले हे जीवघेणो अपघात रोखता येणार नाहीत ?

75,000 young victims of the accident | अपघाताचे 75,000 तरुण बळी

अपघाताचे 75,000 तरुण बळी

वाहतुकीचे नियम पाळत, हेल्मेट-सीटबेल्ट लावून गाडय़ा चालवणं जुनाट कसं काय असू शकतं?
 
3विवाहानंतर अवघ्या चौथ्या दिवशी निलय सपत्नीक मुंबईहून ठाण्याला मित्रच्या घरी गेला. तेथून परतताना मोकळा घोडबंदर रोड पाहून त्याने बाईकचा अॅक्सीलेटर वाढवला. ही त्याची जुनीच खोड. एकामागोमाग एक शेजारून जाणा:या गाडय़ा तो मागे टाकू लागला. एका भल्यामोठय़ा वळणावर त्याचा तोल गेला आणि दोघेही बाईकसह शेजारून जाणा:या अजस्त्र ट्रेलरच्या चाकांखाली गेले. दोघांचे जागीच मृत्यू झाले. पोस्टमार्टेमनंतर मृतदेह घरी आणले तेव्हा त्यावरील पांढरं कापड बाजूला सारून त्यांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही इतके ते छिन्नविच्छिन्न झाले होते. एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने त्याच्या वृद्ध मात्यापित्यांचा आधारच गेला.
रस्त्यांवरील अपघातांच्या अशा बातम्यांनी रकानेच्या रकाने भरलेले असतात. 
त्यात तपशील असतो तो बहुतांशी तरण्याताठय़ा मुलांचा. 
गेल्या वर्षभरात देशभरातील अपघातांनी 15 ते 34 वर्षे वयोगटातील तब्बल 75 हजार युवकांचे प्राण घेतलेत. भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रलयाच्या परिवहन संशोधन शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या 2014 च्या रस्ते अपघात अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. 
2014 मधे देशात रस्त्यांवरील अपघातांमधे गेलेले 53 टक्के बळी या 15 ते 34 वर्षे वयोगटातील आहेत. अगदी भारतातच नव्हे, तर जगभरातही हीच स्थिती आहे. रस्त्यांवरील अपघातांमधे जगात 15 ते 29 या वयोगटातील तरूण बळी जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. जगात एकूण 3.4 लाख तरूण दरवर्षी अपघातांमधे रस्त्यांवर अखेरचे आचके देतात. या अपघातांमधे देशात जितके मृत्यू होतात त्यातील सुमारे दहा टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतात.
कधी मुंबई-पुण्यासारख्या शहरात रात्री उशिरा फिरताना मोकळ्या रस्त्यांवर धूमस्टाईल रेसर बाइक जाताना आढळतात. आवाज करीत मागून आलेल्या बाइकस्वारांच्या टोळ्यांवर नजर टाकेर्पयत त्या नजरेआड कधी होतात, ते कळतही नाही. पाहणा:याच्या जिवाचा अगदी थरकाप उडतो, ते पाहून. वेगाचं हे वेड तरूणांना मृत्यूच्या खाईत घेऊन जातं. पैजा लावून बाइकच्या रेस लावणा:या तरूणांच्या अशा अनेक टोळ्या आहेत. 
कधीकाळी दिवस होते ते सायकलचे. मुलं हट्ट धरून आईवडिलांकडून सायकल मागून घेत. गेल्या दोन दशकात सायकलची जागा दुचाकीने घेतलीय. सध्याचं युग आहे गतीचं. बाइक हाती आली की काही तरुणांच्या डोक्यात वारं जातं. जणूकाही विमानातच बसलोत या थाटात गाडय़ा हाकल्या जातात. ङिागङॉग बाइक चालवून पादचा:यांना आणि समोरून येणा:या गाडय़ांना कसं बिचकवून टाकलं याचेच किस्से कॉलेजच्या पार्किग लॉटमधील बाइकवर बसून सांगितले जातात. 
वाहतुकीचे नियम पाळले आणि सावधगिरी बाळगली तर अपघात रोखता येतात. पण तरूणांकडून जोशात सारे नियम पायदळी तुडवले जातात आणि भीषण अपघात होतात. वेगाने वाहनं चालवण्याचं ‘थ्रिल’ अनुभवण्याची सवय लागली की तिचं एखाद्या व्यसनात रूपांतर होतं. अपघातांची प्रकरणं पाहून, वाचूनही त्यातून बोध घेतला जात नाही. एखादा डॉक्टर, इंजिनिअरचा अपघाती मृत्यू होतो तेव्हा केवळ त्याच्या कुटुंबाचंच नाही, तर समाजाचंही नुकसान होतं. बेदरकार आणि बेपर्वाईने गाडय़ा चालवल्याने आपलाच जीव आपण धोक्यात टाकत नाही, तर रस्त्यावरून जाणा:यांचा काहीही दोष नसताना त्यांना वेठीस धरतो, हे भान बाळगण्याची गरज आहे. 
केवळ बाइकच नव्हे, तर फोर व्हीलर चालवतानाही कमालीचा हलगर्जीपणा दाखवला जातो. ओव्हरटेक करताना रस्त्यावरील परिस्थिती लक्षात घेतली जात नाही. मुळात आपण समोरील वाहन ओलांडणार आहोत, पण ते कितपत गरजेचं आहे? हीच वेळ वाहन ओलांडण्यासाठी सुरक्षित आहे का? वाहनांची सुरक्षितता, रोड सेफ्टी नियम कायद्याचा भंग होतो का? - असे प्रश्न पडत नाहीत आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं.
सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम न पाळणंही चालकांच्या अंगलट येतं. एखाद्या वाहनामागून जात असताना योग्य अंतर राखल्यास प्रसंगी ब्रेकचा वापर करून आपलं वाहन नियंत्रणात ठेवता येतं. त्याचवेळी आपण अचानक थांबत नसल्याने मागील वाहन आपल्या वाहनाला ठोकर देण्याची शक्यताही कमी होते. 
स्टेटस सिम्बॉल झालेलं मद्यपान हेही अपघातांचं एक प्रमुख कारण. मद्यपान अथवा ड्रग्जमुळे लहान मेंदूवरील नियंत्रण गमावून बसलेला वाहनचालक इतरांसाठी धोकादायक ठरू शकतो. बर्थ डे पार्टी, न्यू इयर पार्टी असो की परीक्षेतील यशाचं सेलिब्रेशन. ओली पार्टी करून तरुणांच्या टोळ्या बिनदिक्कत भरधाव कारने जातात. 
 अपघातात जखमी झालेल्या बहुतेकांना उर्वरित जीवन जायबंदी अवस्थेत घालवावं लागतं आणि त्यांचा भार कुटुंबीयांवर पडतो. अपंगत्व आलेल्यांचं कुटुंबावर हलाखीचीही पाळी येते हे ध्यानात घेऊनच अॅक्सिलेटरवर किती पाय द्यायचा हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं.
ऐन तारुण्यात असं रस्त्यात जीव गमावणं हे आपल्या जवळच्या माणसांसाठी किती वेदनादायी असू शकतं, याचा तरी विचार करायलाच हवा.
 
 
1क् नियम
रस्त्यावरून गाडी हाकताना
एवढं जरी केलं तरी धोका कमी होईल !
 
1) स्टॉप ऑर स्लो डाऊन 
 ङोब्रा क्रॉसिंगजवळ वाहन थांबवा अथवा धीम्या गतीने चालवा. सर्व पादचा:यांना रस्ता ओलांडू द्या. तो त्यांचा हक्क आहे, हे ध्यानात ठेवा.
2) बक्कल अप  
सेफ्टी बेल्टमुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सुरक्षित राहता. त्यामुळे अपघातातील मृत्यूचा धोका 60 टक्क्यांर्पयत कमी होतो, असं निदर्शनास आलंय.
3) वाहतूक नियम पाळा 
रस्त्यांवरील मार्गदर्शक चिन्हं (साईन) पाहून त्यानुसारच वाहन चालवा. त्यामुळे अपघात टळतात.
4) वेगमर्यादा पाळा 
तुमच्या स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वेगमर्यादेवर लक्ष ठेवा. निवासी आणि बाजारासारख्या गजबजलेल्या ठिकाणी ताशी 20 किमी ही योग्य वेगमर्यादा आहे. फारतर ताशी 30 किमीर्पयत वेग वाढवू शकता. ताशी वीस किलोमीटर वेगही एखाद्या अपघातात जीवघेणा ठरू शकतो हे लक्षात घ्या.
5) वाहने सुस्थितीत ठेवा 
ब्रेकडाऊन आणि अपघात रोखण्यासाठी वाहनामधे कोणताही बिघाड नाही ना याची खात्री करून घ्या. गाडय़ांची वेळच्या वेळी सव्र्हिसिंग, त्यांची देखभाल हेदेखील अत्यंत महत्त्वाचं आहे.
6) मोबाइल फोन, इअर फोन वापरू नका 
वाहन चालवताना अपघाताकडे खेचून नेणारा गोंधळ टाळण्यासाठी फोन कॉल्स घेऊ नका. कुणाला फोन करू नका. 
7) हेल्मेट वापरा 
दुचाकी चालवताना डोक्याचे रक्षण करण्यासाठी हेल्मेटचा वापर करा. उत्तम दर्जाचे हेल्मेट अपघात झाल्यास डोक्याला गंभीर इजा होण्याचे रोखू शकते. हे प्रमाण 70 टक्के इतकं असल्याचं पाहणीत आढळलंय. त्यामुळे तोंडाला फडकी गुंडाळण्यापेक्षा आणि मुलांनी गॉगल लावून स्टाईल मारण्यापेक्षा न चुकता हेल्मेट वापरायलाच हवं. आणि इतरांनाही आवजरून सांगायला हवं !
8) धोकादायकपणो वाहन चालवू नका 
स्वत:च्या आणि रस्त्याचा वापर करणा:या इतरांच्या सुरक्षेसाठी बेदरकारपणो वाहन चालवायचं टाळा. वाट्टेल तसे बेधडक वाहन चालवू नका, स्वत:च्या ड्रायव्हिंग स्किल्सवर कितीही विश्वास असला तरीही !
9) वाहन चालवताना सौजन्य दाखवा 
सर्वासोबत रस्त्याचा वापर करा. रस्त्यावर कधीही राग काढू नका. ओव्हरटेक करू नका. कुणी केलं तर त्याच्या मागे रेस लावल्यागत धावू नका. जरा सौजन्य दाखवा. कुणी ओव्हरटेक केल्यानं लगेच इगो हर्ट करून घेऊ नका.
10) ड्रिंक आणि ड्राइव्हची गल्लत नको
 जबाबदारीने वागा. मद्यपान करून कधीही वाहन चालवू नका. दारू पिऊन गाडी चालवणं गुन्हा तर आहेच; पण स्वत:सह इतरांच्या जिवाशीही खेळ आहे, हे विसरु नकाच. अगदी दोन मिण्टाच्या अंतरावर जायचं असलं तरी दारू पिऊन गाडी चालवायची नाही !
 
रस्ते-विकास आणि
रस्त्यावरचे बळी?
 
 रस्ते वाहतूक ही देशाच्या आर्थिक विकासाचे मूल्यमापन करणा:या अनेक निकषांपैकी एक महत्त्वाचा निकष आहे. ती देशाच्या विकासाची गती, रचना आणि दर्जा यावर प्रभाव टाकते. जगातील सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं भारतात आहे. मात्र त्याचवेळी या रस्त्यांवरील अपघात ही एक राष्ट्रीय समस्याच झाली आहे. वाढती लोकसंख्या, आधुनिकीकरणाची लाट, रस्त्यांचं वाढतं जाळं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून रस्त्यांवरील अपघात, जखमी आणि मृतांची संख्या यात वाढ झाल्याचं दिसतं. 
रस्ते अपघातांमुळे आर्थिक स्थिती, आरोग्य आणि सामाजिक कल्याणावर नकारात्मक परिणाम होतो. त्यातून होणारे अकाली मृत्यू, जायबंदी होणो आणि उत्पादकतेचे नुकसान होणो, असे दुष्परिणाम होतात.
वाहनांची रचना, ती चालवण्याबाबतची दक्षता, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा नियम, दंडकांचं पालन यामुळे रस्त्यांवरील अपघात आणि त्या अनुषंगाने होणारे मृत्यू, जखमी यांचं प्रमाण कमी करता येऊ शकेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
किरकोळ कारणंही
जिवावर बेततात.
सांभाळा!
ड्रायव्हिंग सीटवर बसलेला कधीतरी गाडी चालवतानाच सिगारेट ओढत असतो. पेटत्या सिगारेटची राख अंगावर पडू शकते. कधीतरी खात असताना ते अंगावर सांडू शकतं. अनेकदा ड्रायव्हिंग सीटवर बसूनच मागील दरवाजा उघडून पुन्हा लावला जातो, पोलीस समोर दिसताच सीट बेल्ट घालण्याची धावपळ सुरू होते. अशा घटनांमुळे चालकाचं लक्ष विचलित होऊन अपघाताला आमंत्रण मिळतं. 
त्यामुळे फोनवर बोलणं, गाडी चालवताना काहीतरी विचार करणं, भसकन ब्रेक दाबणं, कुणाशी तरी बोलणं हे सारं जिवावर बेतू शकतं !
 
 
.............................
भारतातील एकूण रस्ते अपघात
सालसंख्या
20104,99,628
20114,97,686
20124,90,383
20134,86,476
 
भारतातील रस्ते अपघातांतील बळी
20101,34,513
20111,42,485
20121,38,258
20131,37,572
 
रस्ते अपघातांतील जखमी
20105,27,512
20115,11,394
20125,09,667
20134,94,893
...........................
 
राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते अपघात
20101,49,929
20111,49,732
20121,42,694
20131,36,786
 
राष्ट्रीय महामार्गावरील बळी
201048,466
201152,924
201248,768
201345,612
 
राष्ट्रीय महामार्गावरील जखमी
20101,65,012
20111,56,008
20121,53,502
20131,43,107
....................

 

Web Title: 75,000 young victims of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.