शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

दर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 6:00 PM

येत्या 18 तारखेला ‘द वर्ल्ड डे ऑफ रीमेंबरन्स फॉर ट्राफिक व्हिक्टिम्स.’ त्याची थिम आहे, ‘रोड्स हॅव स्टोरीज !’

ठळक मुद्देगाडी ठोकल्याच्या, बुंगाट गाडी चालवण्याच्या पागलपणाच्या आणि अपघाताच्या या कथा कशा टाळता येतील?

मनीषा म्हात्रे

रोज सकाळी वर्तमानपत्रं उघडलं की रस्ते अपघाताची बातमी कळते. तरुण कुणीतरी त्यात जीव गमावून बसलेलं असतं. कुणीतरी त्यात आपला मित्र असतो, कुणी सगासोयरा. जीव कळवळतो. आयुष्यभरासाठी माणसांना गमावून बसण्याची आफत ओढावते. आणि हळहळ करण्यापलीकडे हातात काहीही उरत नाही. जगभरात हे चित्र आहेच; पण भारतात ते अधिक विदारक आहे.येत्या 18 तारखेला जगभर या रस्ते अपघात जनजागृतीसाठी एक दिवस साजरा केला जाणार आहे. गेली 10 वर्षे जगभरातले अनेक देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांतर्गत यादिवसानिमित्त जनजागृती करतात. ‘द वर्ल्ड डे ऑफ रीमेंबरन्स फॉर ट्राफिक व्हिक्टिम्स.’ असं या दिवसांचं नाव. आणि त्याची थिम आहे, ‘रोड्स हॅव स्टोरीज !’अशा अनेक रस्ताकथा आपल्या सगळ्यांकडे असतात, गाडी ठोकल्याच्या, बुंगाट गाडी चालवण्याच्या पागलपणाच्या आणि अपघाताच्या.त्या टाळता येतील का?टाळायला हव्यात कारण या देशातली रस्ते अपघातांची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे.

महाराष्ट्रात चित्र काय?

वाहनचालकांच्या निष्काळजीमुळे राज्यात 2017 मध्ये 35, 853 अपघात झाले.

 12,264 जणांना त्यात जीव गमवावा लागला.  20,465 जण गंभीर जखमी झाले.

 जानेवारी ते मार्च  2018 या केवळ तीन महिन्यांत 9264 अपघात झाले.3361 जणांचे मृत्यू झाले. यातील ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण शहरी भागातील अपघातांच्या जवळपास तिप्पट असल्याचे आकडेवारीवरून दिसते. घडलेले सर्व अपघात वाहनचालकांची निष्काळजी, धोकादायक ओव्हरटेक व अविचार, हयगयीने वाहन चालवल्यामुळे झाले आहेत. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार राज्यात 1 हजार 324 अपघातग्रस्त ठिकाणं असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात दिली होती. 

2017 साली भारतात 4,64, 910रस्ते अपघात झाले.

1,47, 913लोकांनी त्यात आपलेजीव गमावले.

405 माणसंदर दिवशी देशात सरासरीरस्ते अपघातात बळी पडतात.

1,290 माणसं रोज अपघातात जखमी होतात. 

16माणसं दर तासालारस्ते अपघात मरतात.