शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

सुटीत फुकट करता येतील अशा 10 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:57 IST

भली मोठी सुटी असून, हातात पुरेसा वेळ असूनही आपण काहीच केलं नाही, असं वाटतं? त्यावर उत्तर शोधा.

ठळक मुद्देएकटय़ानं जमेल तेवढं करा. आपण कुणासाठी थांबून राहू नये हे उत्तम.

- निकिता महाजन

उन्हाळ्याची सुटी सुरू झाली. आता या सुटीत काय करायचं, असा प्रश्न असतोच. मुळात मनात आपण अनेकदा ठरवलेलं असतं की, या सुटीत काहीतरी लाइफ चेंजिंग करावं असं मनात येतं. प्रत्यक्षात होत काहीच नाही, कारण आपण करत काहीच नाही. का करत नाही?कारण आपल्याला काहीतरी भव्यदिव्य करायचं असतं आणि ते भव्यदिव्य करायला आपल्याकडे पैसा नसतो, कधी घरच्यांची परवानगी मिळत नाही, कधी दोस्त आपल्यासोबत ते करायला तयार होत नाहीत. कारणं काढून पाहा, आपण शंभर कारणं सांगू की अनेकदा भली मोठी सुटी असून, हातात पुरेसा वेळ असूनही आपण काहीच का करू शकलो नाही? ते केलं नाही म्हणून आपण काही स्किलही कमावले नाहीत आणि आनंदही कमावला नाही. सुटीचा सदुपयोग केलाच नाही तर हा महत्त्वाचा वेळ हातातून निसटून जातो आणि मग पुढे नोकरी-कामाच्या रगाडय़ात काहीच करता आलं नाही, येत नाही म्हणून खंत वाटत राहाते.म्हणून ही घ्या यादी. यापैकी काहीही एक गोष्ट करून पहायला तुम्हाला पैसे पडणार नाहीत. किरकोळ पैसे क्वचित लागतील. आणि डोकं लावलं, जरा विचार केला तर तुम्हालाही अनेक कल्पक गोष्टी सुचून ही सुटी सत्कारणीच लावता येणार नाही, तर ती जगण्याला नवीन आकार आणि नजर द्यायलाही तयार होईल.अजून एक महत्त्वाची गोष्ट. कुणीच दोस्त सोबत नाहीत, बाकीचे हसतात. ते करत नाहीत म्हणून मी करत नाही असं काही स्वतर्‍ला सांगू नका. आपल्या दोस्तांना आपण करत असलेल्या गोष्टींचं महत्त्व पटवून द्या. ते सोबत  येतील असं पाहा. पण नाहीच म्हणाले तर एकटय़ानं जमेल तेवढं करा. आपण कुणासाठी थांबून राहू नये हे उत्तम.तर काय काय करता येऊ शकेल याची ही एक सोपी यादी.

1. निअर टू फारअनेकांना वाटतं की आपण प्रवास करायला हवेत. म्हणजे अमेरिका, थायलंड, इंग्लंड अशा देशात आपण फिरलो असतो; पण आपल्याकडे पैसे नाहीत, साधं मुंबई-दिल्लीला जाता येत नाही. परदेशात काय जाणार?मात्र असा विचार करू नका. जगभर एक महत्त्वाचं सूत्र मानलं जातं. ते म्हणजे निअर टू फार. म्हणजे आधी जी गोष्ट आपल्या जवळची आहे ती पाहा. अगदी गावातली, पंचक्रोशीतली, तालुक्यातली, जिल्ह्यातली गोष्ट समजून घ्या. आपल्या जिल्ह्याचा तरी किमान इतिहास-भूगोल, प्रश्न, खानपान हे सारं समजून घ्या. अगदी जवळ आहे तिथून सुरुवात करा आणि मग जग पाहा. त्यासाठी पैसे नाही फक्त नजर लागते.2. गो लोकलपुन्हा सूत्र तेच. लोकल ग्लोबल असण्याचा हा जमाना आहे. मोअर द पर्सनल, मोअर द लोकल इज मोअर द ग्लोबल असं नवीन समीकरण आहे. त्यामुळे लोकल अर्थात स्थानिक जे जे महत्त्वाचं ते ते सारं समजून घ्या. गावचं मंदिर ते गावातली नदी, तिचं प्रदूषण, ते पीकपाणी इथून माहिती काढत गेलं तर हाती लागेल त्याची लिंक कुठंतरी ग्लोबल काळात लागेल.3. प्रवास . कमी खर्चात!म्हणजे काय अभ्यासच करायचा का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अभ्यास नव्हे, प्रवास करा. आणि तोही जवळच्या जवळ, एसटीनं, सार्वजनिक वाहनानं, पायी करा. फिरा. किमान आपला जिल्हा, आपलं राज्य तरी या उन्हाळ्यात समजून घ्या.4. पायी फिरा.अगदी एसटीचेही पैसे नाहीत तुमच्याकडे असं मानलं तर पायी फिरा. घरून डबा घेऊन जा, एक दहा किलोमीटरचा परीघ फिरून या. नोंदी काढा की कोण कोण भेटलं, काय बोललं, काय दिसलं. इतकं चांगलं ग्राउण्ड वर्क करायची संधी एरव्ही कधीही मिळणार नाही.

5. अनुभव कमवा

आपल्याला जे काम आवडतं किंवा ज्यात करिअर करायचं आहे असं वाटतं, त्याचा आपल्याला अनुभव काय?तर काहीच नाही. तो मिळण्याची शक्यताही नसतेच. मग आपण आपल्या विषयात काम करणार्‍या तज्ज्ञांना, अनुभवी लोकांना भेटावं. काम समजून घ्यावं. संधी मिळालीच तर पैसे न मागता झोकून देऊन काम करावं. काम शिकावं. हे काही दिवस जरी केलं तरी आपल्या स्किलची कमाई मोठी असेल.

6.कधीच केलं नाही ते.असं काम जे आपण आजवर कधीच केलेलं नाही, करण्याची शक्यता नाही ते करून पाहा. काहीही. अगदी गवंडी काम, सुतार काम शिकता येतं का? रोज घरात कपडे धुतले तर? रांगोळी काढायला शिकली तर? स्वयंपाक शिकला तर? वाळवणं करायला मदत केली तर?असं बरंच काही आहे, जे करायला पैसे नाही तर फक्त उत्साह लागतो.  आळस सोडला तर तोही चटकन संचारतो.

7. सिनेमे पाहा.

पायरेटेड नव्हे तर चांगल्या सिनेमाच्या सीडी मिळवा, यू-टय़ूबवर अनेक फिल्म्स, शॉर्टफिल्म उपलब्ध आहेत, उत्तम गाणी आहेत, उत्तम भाषणं आहेत. ते भरपूर पाहा. हातातल्या फोनचा, दीड जीबीचा उत्तम उपयोग करा.

8. पुस्तकं ऐका.पुस्तकं भरपूर वाचाच, पण वाचनाचा कंटाळाच असेल तर आता पुस्तकं ऐकण्याचीही सोय उपलब्ध आहे. ती पुस्तकं ऐका.

9. गाव आणि ग्रामपंचायतआपल्याला आपलं गाव, ग्रामपंचायतीचं काम, ग्रामसभा, तिचे हक्क हे तरी कुठं माहिती असतं. ते समजून घ्या. गावात आपण दोस्त मिळून काय छोटं काम करू शकतो, याचा अंदाज घ्या. आपल्याला आपलं गावही समजून घेता येणं गरजेचं आहे.

10. व्यायामयादीत शेवटीच येतो हा विषय नेहमी. आणि कुणी विचारेलही की, उन्हाळ्यात कुणी व्यायाम करतो का? मात्र सुटी आहे नियमित चालणं, वेट ट्रेनिंग, पळणं हे तर सहज करता येईल. स्वतर्‍कडे लक्ष देणं हे काही कमी महत्त्वाचं नाही.