उत्तम मुलाखतीसाठी न विसरता करण्याच्या 10 गोष्टी
By Admin | Updated: December 25, 2014 19:03 IST2014-12-25T19:03:40+5:302014-12-25T19:03:40+5:30
पुढच्या वर्षी इण्टरव्ह्यूला जाल, तेव्हा लक्षात ठेवून आचरणात आणायची यशस्वी प्रोफेशनल लाइफची पायाभरणी करण्यासाठीची ही काही खास सूत्रं.

उत्तम मुलाखतीसाठी न विसरता करण्याच्या 10 गोष्टी
>विनोद बिडवाईक
पुढच्या वर्षी इण्टरव्ह्यूला जाल, तेव्हा लक्षात ठेवून आचरणात आणायची यशस्वी प्रोफेशनल लाइफची पायाभरणी करण्यासाठीची ही काही खास सूत्रं.
-----------
एखाद्या जागेसाठी, पदासाठी आवश्यक असणारा उमेदवार कसा असावा याचं वर्णन ब:याच संस्थांमध्ये आधीच तयार असतं. म्हणजे ते पद, त्यासाठीच्या कामाचं डिझाईन हे सारं आधीच संस्थेनं ठरवलेलं असतं. मग मुलाखतीच्या वेळेस त्या जागेसाठी योग्य (फीट) वाटणारा उमेदवार निवडला जातो. राईट परसन अॅट राईट जॉब हे तत्त्व कसोशीनं पाळण्याचा प्रयत्न केला जातो.
उमेदवाराची निवड करताना ब:याच गोष्टी लक्षात घेतल्या जातात. यामध्ये त्या त्या क्षेत्रतल्या ज्ञानाची परीक्षा तर असतेच; परंतु तुमच्यात असणा:या इतर गुणांचाही विचार केला जातो. यामध्ये साध्या मॅनर्सपासून तुमच्या देहबोलीर्पयत सर्व घटक असतात.
‘शितावरून भाताची परीक्षा’ या म्हणीप्रमाणो पहिल्या पाच मिनिटांतच तुमच्याबद्दल मत बनवलं जातं. नोकरी मिळवण्यासाठी आपली मुलाखत ‘जास्तीत जास्त’ प्रभावी कशी होईल याचा प्रय} करायला हवा. मात्र इतरांना इम्प्रेस करण्यापूर्वी स्वत:शीही जरा बोलायला हवं.
या कॉलमचा निरोप घेताना ही सूत्रं कायम तुमच्यासोबत राहावी आणि तुमचं व्यावसायिक आयुष्य अत्यंत यशस्वी व्हावं, याच शुभेच्छा.
आणि त्यासाठी लक्षात ठेवण्याची ही काही सूत्रं.
मुलाखतीला जाण्यासाठी सर्वप्रथम स्वत:बद्दल विचार करायला हवा. माझं शिक्षण या जॉबसाठी योग्य आहे का? हा जॉब करण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स माङयात आहेत का? तुमच्या गरजा, आवडीनिवडी आणि ही नोकरी यांचा काही मेळ जमतोय का, या सा:याचा विचार करायला हवा.
अर्ज करताना तुमचा बायोडेटा कसा आहे, हेही लक्षात घेतलं जातं. एका सव्रेक्षणानुसार येणा:या बायोडेटांपैकी फक्त 15 टक्के बायोडेटांचाच मुलाखतीसाठी विचार केला जातो. काही बायोडेटा एवढे वाईट असतात की ते सरळ कच:याच्या टोपलीत टाकले जातात. बायोडेटाच्या ङोरॉक्स काढून त्यावर स्वत:चं नाव टाकून पाठवणंही चूक आहे हेदेखील लक्षात ठेवा.
त्या त्या जॉबनुसार तुमचा बायोडेटा तयार करून घ्यायला हवा. बायोडेटा पाठवताना त्यावर व्यवस्थित लिहिलेलं कव्हरिंग लेटर आवश्यक असतं. त्यामध्ये तुमच्या करिअरची, शिक्षणाची छोटीशी समरी असायला हवी.
बायोडेटा ई-मेलने पाठवताना वर्ड फॉरमॅटमध्ये पाठवावा. सोबत कव्हरिंग लेटर स्वतंत्र टाईप करून पाठवावं. ई-मेलमधेच स्वत:बद्दल त्रोटक माहिती देऊन चार ओळीत नोकरीसाठी अर्ज करणारे महाभाग असतात.
बायोडेटा तयार केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात, त्या जॉबचं वेिषण करणं आवश्यक असतं. तुमचं व्यक्तिमत्त्व आणि करिअरची उद्दिष्टं नेहमी मॅच व्हायला हवीत.
निवडप्रक्रिया ब:याचदा सारखीच असते. मुलाखतीचा पॅटर्नही ठरलेला असतो. जर तुम्ही फ्रेश असाल तर कदाचित वेगवेगळ्या टेस्ट, गटचर्चा आणि मुलाखतीच्या दिव्यातून तुम्हाला जावं लागतं. त्यासाठी वेगळी तयारी आवश्यक ठरते.
सर्व प्रश्नांची उत्तरे देऊनही आपली निवड का झाली नाही, हा प्रश्न पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आपल्याला माहिती हवं की उमेदवारांमध्ये मुलाखत घेताना काय बघितलं जातं?
मुलाखतीदरम्यान उमेदवारांबद्दल महत्त्वाची माहिती घेतली जाते.
कौशल्य- व्यक्तीमध्ये काम करण्याचे कौशल्य कितपत आहे, स्किल्स आहेत की नाही?
ज्ञान- नोकरी हवी त्या क्षेत्रतील माहिती कितपत आहे? म्हणजे नॉलेज किती आहे.
चातुर्य- टॅलण्ट ही मानसिक अवस्था आहे. विचार करण्याची पद्धत आहे. त्यामधे तुमचं वर्तन, विचाराची पद्धत, थॉट प्रोसेस तपासली जाते.
आणि मुख्य म्हणजे उमेदवार. - हा उमेदवार हे काम करू शकेल का? - काम करण्याची त्याची इच्छाशक्ती आहे का? आणि तो संस्थेमध्ये / टीममध्ये स्वत:ला योग्यपणो सामावृून घेऊ शकेल का? - या तीन प्रश्नांची उत्तरं बारकाईनं शोधली जातात. त्यामुळे मुलाखत देताना या सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्या पद्धतीने मुलाखतीची तयारी करा. तुमचं सिलेक्शन होवो अथवा न हावो, मुलाखत झाल्यावर एक थॅँकिंग नोट पाठवायला विसरु नका. ही एक थॅँकिंग नोट तुमच्या पुढच्या जॉबची किल्ली ठरू शकते.