शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

यू मुंबाच्या अग्रस्थानाच्या आशा कायम

By admin | Updated: March 2, 2016 02:53 IST

तुफानी खेळाचे प्रदर्शन करताना बलाढ्य यू मुंबाने तेलगू टायटन्सचे आव्हान संपुष्टात आणताना ३८-२२ असा शानदार विजय मिळविला.

रोहित नाईक, मुंबईतुफानी खेळाचे प्रदर्शन करताना बलाढ्य यू मुंबाने तेलगू टायटन्सचे आव्हान संपुष्टात आणताना ३८-२२ असा शानदार विजय मिळविला. यासह प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्राच्या गुणतक्त्यात अग्रस्थान मिळविण्याच्या मुंबईच्या आशा कायम असून, अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना तळाला असलेल्या दबंग दिल्लीविरुद्ध भिडावे लागेल. याआधी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने झुंजार विजय मिळवताना बंगळुरू बुल्सला २६-२२ असा धक्का देऊन उपांत्य फेरी निश्चित केली. तेलगूच्या पराभवाचा फायदा पुणेकरांना झाला असून, त्यांचीही उपांत्य फेरी निश्चित झाली आहे.वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये यू मुंबाने आक्रमक खेळाच्या जोरावर एकहाती वर्चस्व राखताना तेलगूला अखेरपर्यंत संधी दिली नाही. रिशांक देवाडिगाने पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमण करताना १४ गुणांची वसुली केली. कर्णधार अनूप कुमारनेही त्याला चांगली साथ दिली. बचावात मोहित चिल्लर, जीवा कुमार यांनी मजबूत पकडी करून तेलगूच्या आव्हानातली हवा काढली.मध्यंतराला १८-१० असे वर्चस्व राखल्यानंतर यू मुंबाने आणखी वेगवान खेळ करीत आपला हिसका दाखवला. तेलगूवर एकूण ३ लोण चढवून मुंबईकरांनी तुफानी खेळ केला. बाद फेरीसाठी विजय अनिवार्य असलेल्या तेलगूकडून कर्णधार राहुल चौधरीचा अपवाद वगळता एकही खेळाडू चमकला नाही. राहुलने अप्रतिम अष्टपैलू खेळ करताना १२ गुण मिळवताना एकाकी लढत दिली.तत्पूर्वी, बंगाल वॉरियर्सने अखेरच्या क्षणी खेळ उंचावून बंगळुरू बुल्सचे आव्हान २६-२२ असे परतवून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीसाठी विजय आवश्यक असलेल्या बंगालवरील दडपण सुरुवातीपासूनच जाणवत होते. मात्र, कर्णधार नीलेश शिंदेने जबरदस्त पकडी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मध्यंतराला १३-११ अशी आघाडी राखलेल्या बंगालला दुसऱ्या डावात बंगळुरूने चांगलेच झुंजवले. दीपक कुमार दहियाने खोलवर चढाया करताना बंगालवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, नीलेशसह दीपक कुमारने निर्णायक पकडी करून बंगालची उपांत्य फेरी निश्चित केली. त्याचप्रमाणे जँग कुन ली व महेश महेश गौड यांनी आक्रमक चढाया करताना बंगालसाठी चांगली कामगिरी केली.