शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

यूनिसचे विक्रमी शतक तरीही आॅस्ट्रेलिया मजबूत

By admin | Updated: January 6, 2017 01:06 IST

अनुभवी फलंदाज युनिस खानने गुरुवारी येथे ११ देशांत कसोटी शतक ठोकण्याचा अनोखा विक्रम केला;

सिडनी : अनुभवी फलंदाज युनिस खानने गुरुवारी येथे ११ देशांत कसोटी शतक ठोकण्याचा अनोखा विक्रम केला; परंतु त्याच्या जिगरबाज नाबाद खेळीनंतरही आॅस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पाकविरुद्ध आपले पारडे जड ठेवले.यूनिसने त्याचे ३४ वे कसोटी शतक पूर्ण करुन सुनील गावस्कर, ब्रायन लारा, माहेला जयवर्धनेसारख्या दिग्गज फलंदाजांची बरोबरी केली आणि जगातील ११ देशांत शतक बनवणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. तो १३६ धावांवर खेळत आहे.त्याची शानदार खेळी तसेच त्याने सलामीवीर अजहर अली (७१) याच्या साथीने तिसऱ्या गड्यासाठी केलेल्या १४६ धावांच्या भागीदारीनंतरही पावसाचा व्यत्यय आलेल्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तान ८ बाद २७१ धावा करुन फॉलोआॅनसाठी झुंजत आहे.तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने गमावणारा पाकिस्तान अजूनही आॅस्ट्रेलियाच्या २६७ धावांनी पिछाडीवर आहे. आॅस्ट्रेलियाने त्यांचा पहिला डाव ८ बाद ५३८ धावांवर घोषित केला होता.पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही; परंतु त्यानंतर सिडनी मदानावर यूनिसच्या जिद्दीची व विक्रमाचीच चर्चा रंगली. यूनिसने संयुक्त अरब अमिरातशिवाय सर्वच कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध शतके ठाकली. अशा प्रकारे त्याने ११ देशांत कसोटी शतक ठोकले. हा विक्रम ठरला. (वृत्तसंस्था)यूनिसशिवाय अन्य कोणताही फलंदाज टिकाव धरु शकला नाही. दुसऱ्या सत्रात खेळ सुरु झाल्यानंतर अजहर धावबाद होऊन तंबूत परतल्याने त्यांची स्थिती खराब झाली. यूनिस आणि अजहर यांनी काल पाकिस्तानला २ बाद ६ या धावसंख्येवरुन सावरले होते. यूनिसने फिरकी गोलंदाज नाथन लियोनच्या आखूड टप्प्यावर मिडविकेटला फटका मारला; परंतु त्याने धाव घेण्यास विलंब लावला. त्या गफलतीत अजहर धावबाद झाला. मॅथ्यू वेड आजारी पडल्यामुळे त्याच्या जागेवर हँड्सकॉम्बने यष्टिरक्षणाची जबाबदारी पत्करली. आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) ८ बाद ५३८ घोषित.पाकिस्तान : पहिला डाव : ९५ षटकात ८ बाद २७१. (युनिस खान खेळत आहे १३६, अजहर अली ७१, सर्फराज अहमद १८, मिस्बाह उल हक ८. नाथन लियोन /९८, हेजलवूड २/५३).