नवी दिल्ली - ट्रॅक आणि फिल्डच्या दोन अॅथलिटसह चार अन्य अल्पवयीन खेळाडू राष्ट्रीय डोपिंग विरोधी पथकाला प्रतिबंधित पदार्थांच्या सेवानात दोषी आढळले आहेत. त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंचे नमुने तपासणीसाठी गेल्या नोव्हेंबरमध्ये तिरुपती येथे १७ व्या मिलो राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर अॅथलेटिक्स मीटमध्ये घेण्यात आले होते.नाडाने मंगळवारी सांगितले की, ‘या दोंही खेळाडूंना २१ जानेवारीपासून निलंबीत करण्यात आले आहे. अन्य दोन अल्पवयीन खेळाडू मुष्टियुद्ध आणि व्हॉलिबॉल खेळ खेळतात.’मुष्टियोध्याची चाचणी गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ६५ व्या राष्ट्रीय आंतर शालेय स्पर्धेदरम्यान करण्यात आली होती. या चाचणीतील त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला सहा फेब्रुवारीपासून निलंबीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, व्हॉलीबॉलचा खेळाडूही याच स्पर्धेत डोपिंगप्रकरणी दोषी आढळला होता. त्यालादेखील ३१ जानेवारीपासून निलंबीत करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
नाडाच्या परिक्षणामध्ये युवा खेळाडू दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 04:06 IST