शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

युवा आॅलिम्पिक; मनू भाकरने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 03:01 IST

यावेळी समारंभादरम्यान आतषबाजीही झाल्याने रात्री ब्युनास आयर्सचे आकाश उजाळून निघाले. या कार्यक्रमासाठी थायलंडच्या ‘वाईल्ड बोर्स’ पथकाला आमंत्रित करण्यात आले होते आणि या पथकाची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी प्रशंसा केली होती.

ब्युनास आयर्स : युवा नेमबाज मनू भाकरने युवा आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद््घाटन समारंभात ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे, या स्पर्धेचा उद््घाटन समारंभ प्रथमच रस्त्यावर झाला. हा कार्यक्रम बघण्यासाठी यावेळी दोन लाखांपेक्षा अधिक प्रेक्षक पोहोचले होते.यावेळी समारंभादरम्यान आतषबाजीही झाल्याने रात्री ब्युनास आयर्सचे आकाश उजाळून निघाले. या कार्यक्रमासाठी थायलंडच्या ‘वाईल्ड बोर्स’ पथकाला आमंत्रित करण्यात आले होते आणि या पथकाची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी प्रशंसा केली होती.वाईल्ड बोर्स पथक जूनमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यावेळी हे पथक थायलंडच्या चांग राई प्रांत आलेल्या पुरात पाणी व गाळ असलेल्या एका गुहेमध्ये जवळजवळ दोन आठवडे अडकले होते. बाक यांनी पथकाच्या धैर्याची प्रशंसा केली होती. कार्यक्रमादरम्यान गाण्याव्यतिरिक्त टँगो नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.या स्पर्धेसाठी ब्युनास आयर्समध्ये २०६ संघांचे १५ ते १८ वर्षांचे चार हजार खेळाडू सहभागी होतील. भारताचे ४६ खेळाडूंसह ६८ सदस्यांचे पथक अर्जेंटिनामध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेदरम्यान १३ क्रीडा प्रकारामध्ये आव्हान सादर करणार आहे. युवा आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे भारताचे हे सर्वांत मोठे पथक आहे. हॉकी फाईव्समध्ये सर्वाधिक १८ भारतीय खेळाडू (पुरुष व महिला संघांतील प्रत्येकी ९ खेळाडू) सहभागी होत आहे तर मैदानी स्पर्धेत भारताचे सात खेळाडू सहभागी होतील.नेमबाजीमध्ये चार, रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये दोन, बॅडमिंटनमध्ये दोन, जलतरणामध्ये दोन, टेबलटेनिसमध्ये दोन, भारोत्तोलनमध्ये दोन, कुस्तीमध्ये दोन व रोर्इंगमध्ये दोन तर बॉक्सिंग, ज्युडो व स्पोर्ट््स क्लाइंबिंगमध्ये प्रत्येकी एक भारतीय स्पर्धेत आव्हान सादर करणार आहे. (वृत्तसंस्था)नेमबाज शाहू तुषार माने याचा रौप्य वेधनेमबाज शाहू तुषार मानेने पुरुषांच्या १० मी. एअर रायफल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करीत युवा आॅलिम्पिक स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला पदकाचे खाते उघडून दिले. तिसऱ्या स्थानावर फायनल्ससाठी पात्रता मिळवणाºया मानेने २४७.५ गुणांसह दुसरे स्थान पटाकावले तर ग्रिगोरी शामाकोव्हने २४९.२ गुणांसह सुवर्ण पदकावले.सर्बियाच्या एलेक्सा मित्रोविचने २२७.९ गुणांसह कांस्य जिंकले. फायनल फेरीपूर्वी मानेने २२८ तर मित्रोविचने २२७.९ गुण मिळवले. अंतिम फेरीत भारतीय नेमबाजाने ९.६ व ९.९९ गुण मिळवले, तर सुवर्णपदक विजेत्या शामाकोव्हने १०.४ व १०.७ गुणांचे नेम साधून वर्चस्व राखले.

टॅग्स :Hockeyहॉकी