बालिंगे हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

By Admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:19+5:302014-08-27T21:30:19+5:30

कोल्हापूर : भारती शिक्षण मंडळ, बालिंगे (ता. करवीर)च्या बालिंगे हायस्कूलने क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले. इयत्ता सातवीतील विद्यार्थी संकेत अनिल जांभळे याची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडाप्रबोधिनी अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल संकेत जांभळेचा सत्कार शिक्षण मंडळाचे सहसचिव मधुकर जांभळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर क्रीडाशिक्षक एस. बी. वरुटे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव जांभळे, उपाध्यक्ष आनंदा माने, आर. के. वाडकर, एम. एस. भवड, ग्रामपंचायत सदस्य अनिल जांभळे, शशांक जांभळे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

Yoga in Balinge High School Sports Competition | बालिंगे हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

बालिंगे हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

ल्हापूर : भारती शिक्षण मंडळ, बालिंगे (ता. करवीर)च्या बालिंगे हायस्कूलने क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले. इयत्ता सातवीतील विद्यार्थी संकेत अनिल जांभळे याची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडाप्रबोधिनी अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल संकेत जांभळेचा सत्कार शिक्षण मंडळाचे सहसचिव मधुकर जांभळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर क्रीडाशिक्षक एस. बी. वरुटे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव जांभळे, उपाध्यक्ष आनंदा माने, आर. के. वाडकर, एम. एस. भवड, ग्रामपंचायत सदस्य अनिल जांभळे, शशांक जांभळे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
------------------------------------------------
फोटो ओळी : बालिंगे हायस्कूलचा विद्यार्थी संकेत जांभळे याची शिवछत्रपती क्रीडाप्रबोधिनीमार्फत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करताना भारती शिक्षण मंडळाचे सहसचिव मधुकर जांभळे. शेजारी वसंतराव जांभळे, शशांक जांभळे, एम. एस. भवड, आदी. (फोटो- २७ कोल बालिंगे)

Web Title: Yoga in Balinge High School Sports Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.