वायएमसीए फुटबॉल

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:40+5:302015-08-11T22:11:40+5:30

भवन्स, सेंट जॉन्स, सेंट मायकेल

YMCA Football | वायएमसीए फुटबॉल

वायएमसीए फुटबॉल

न्स, सेंट जॉन्स, सेंट मायकेल
सेंट पलोटी स्कूल उपांत्य फेरीत
वायएमसीए आंतरशालेय फुटबॉल
नागपूर : आष्टी येथील भवन्स स्कूल, सेंट जॉन्स स्कूल, सेंट मायकेल स्कूल आणि सेंट विन्सेंट पलोटी स्कूलने मंगळवारी वायएमसीए आयोजित १६ वर्षांखालील मुलांच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
वायएमसीएतर्फे बिशप कॉटन स्कूल मैदानावर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फाल्गुन घंटेवारने केलेल्या तीन गोलच्या बळावर भवन्स स्कूलने जी.एच. रायसोनी स्कूलला ३-१ ने पराभूत केले.
सेंट जॉन्स स्कूलने हिंगणा येथील सेंट झेव्हियर्स स्कूलला २-० ने नमवित उपांत्य फेरी गाठली. सेंट मायकेल स्कूलने श्रीकृष्णनगर येथील भवन्स स्कूलला टायब्रेकरमध्ये ४-२ अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत होता. शेवटच्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट विन्सेंट पलोटी स्कूलने सिव्हिल लाईन्स येथील भवन्स स्कूलला २-० अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का देत
उपांत्य फेरी गाठली. शुभम तिवारीने (२०) आणि कमरान खानने (३८) व्या मिनिटाला गोल करण्याची संधी गमावली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
................................................................
स्वरा, नीती यांना विजेतेपद
सोमलवार स्मृती आंतरशालेय बुद्धिबळ
नागपूर : सोमलवार अकादमी एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित एल. जी. सोमलवार स्मृती आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक विभागात मुलींच्या गटात दाभा येथील सेंटर पॉईंट स्कूलची स्वरा दळवी आणि हायस्कूल विभागात जैन इंटरनॅशनल स्कूलची नीती तातियाने विजेतेपद पटकावले. खामला येथील सोमलवार निकालस शाळेच्या सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, ॲड. मधुकरराव सोमलवार ,सचिव प्रकाश सोमलवार, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव के.के. बारट यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शशिकांत चांदे यांनी केले. (क्रीडा प्रतिनिधी)
............................................................

Web Title: YMCA Football