WWE Superstar The Undertaker Retire, World Wrestling Entertainment (WWE) | “माझी वेळ संपली, मला निरोप द्या”; सुपरस्टार अंडरटेकरची WWE मधून निवृत्तीची घोषणा

“माझी वेळ संपली, मला निरोप द्या”; सुपरस्टार अंडरटेकरची WWE मधून निवृत्तीची घोषणा

WWE मधील सुपरस्टार अंडरटेकरनं अखेर रविवारी निवृत्तीची घोषणा केली, वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंटरमध्ये सरवाइवर सीरीज २०२० मध्ये अंडरटेकर शेवटचा रिंगात दिसला. यावेळी त्याने स्वत:ची फेमस वॉकसह एन्ट्री घेतली. २२ नोव्हेंबर १९९० रोजी डेब्यू करणाऱ्या अंडरटेकरनं २२ नोव्हेंबरलाच WWE ला शेवटचा निरोप दिला

अंडरटेकरनं सांगितले की, रिंगातील माझी वेळ आता संपली आहे, मला निरोप द्या, यावेळी WWE मधील चॅम्पियन्स ट्रिपल एच, शॉन माइकल्स, रिक फ्लेयर आणि केनदेखील उपस्थित होता. या सर्वांनी अंडरटेकरला ३० वर्षाच्या कारकिर्दीसाठी धन्यवाद दिले.

१९९० मध्ये पदार्पण आणि ३० वर्षाची कारकिर्द

WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं १९९० मध्ये WWE शी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं. त्याच्या नावावर ७ जागतिक जेतेपदं. सहा टॅग टीम चॅम्पियन्स जेतेपदं आहेत. शिवाय त्यानं २००७ मध्ये रॉयल रंम्बल आणि १२ वेळा स्लॅमी पुरस्कार जिंकला आहे. Wrestlemania मधील यशस्वी खेळाडूंमध्ये अंडरटेकरचं नाव येतं. त्यानं सलग २१ Wrestlemania सामने जिंकले आहेत. त्याची ही विजयाची मालिका ब्रॉक लेसनरनं खंडीत केली होती.

एप्रिलमध्ये शेवटची मॅच खेळली

५५ वर्षीय अंडरटेकरनं WWE मध्ये त्याचा शेवटचा मुकाबला रेसलमेनिया ३६ AJ स्टाइल्सदरम्यान खेळला, ज्यात डेडमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या अंडरटेकरनं विजय मिळवला होता. अंडरटेकरनं रिंगवॉकच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.

Web Title: WWE Superstar The Undertaker Retire, World Wrestling Entertainment (WWE)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.