वुशू स्पर्धा

By Admin | Updated: August 16, 2014 23:08 IST2014-08-16T23:08:07+5:302014-08-16T23:08:07+5:30

वुशू स्पर्धेत विदर्भ बुनियादी चॅम्पियन

Wushu tournaments | वुशू स्पर्धा

वुशू स्पर्धा

शू स्पर्धेत विदर्भ बुनियादी चॅम्पियन
नागपूर: सक्करदरा येथील विदर्भ बुनियादी हायस्कूल संघाने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तर वुशू स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. जवाहर सभागृह नवीन नंदनवन येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विदर्भ बुनियादी संघाचे इशान कडू, निशांत तिरपुडे, बॉबी गुल्हाने, मंजिरी निकम, अंतरा सावरकर, सांची मेश्राम, दिव्यानी दडमल, श्वेता वैद्य, मेघा मिराशे, अनुप ठाकरे, नम्रता हटवार, श्रद्धा हटवार, पायल हटवार, यश बावणे, यांनी चमकदार कामगिरीसह पदके जिंकली. या सर्व खेळाडूंची निवड नाशिक येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी नागपूर जिल्हा संघात करण्यात आली आहे. प्रशिक्षक प्रफुल्ल गजभिये आणि क्रीडा शिक्षक विलास गांगुलवार यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन मिळाले.(क्रीडा प्रतिनिधी)
.................

Web Title: Wushu tournaments