Wrestlers Protest : पदक जिंकल्यावर खेळाडूंसोबत फोटो काढणारे पंतप्रधान मोदी गप्प का? ऑलिम्पियन बजरंग पुनियाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 15:51 IST2023-04-25T15:48:27+5:302023-04-25T15:51:28+5:30
Wrestlers Protest : भारतीय कुस्तीत वेगळीच 'दंगल' सुरू असल्याची पाहायला मिळत आहे...

Wrestlers Protest : पदक जिंकल्यावर खेळाडूंसोबत फोटो काढणारे पंतप्रधान मोदी गप्प का? ऑलिम्पियन बजरंग पुनियाचा सवाल
Wrestlers Protest : भारतीय कुस्तीत वेगळीच 'दंगल' सुरू असल्याची पाहायला मिळत आहे... ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंग ( Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात तीन महिन्यांपासून आंदोलनाला उतरले आहेत. बृजभूषण यांच्यावर खेळाडूंनी शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत आणि यासाठी कुस्तीपटू जंतरमंतरवर उपोषणाला बसले आहेत. त्यांना रात्री रस्त्यावरच झोपावे लागले. सर्वोच्च न्यायायलाने अखेर या प्रकरणाची दखल घेताना दिल्ली पोलिसांना बृजभूषण यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
तीन महिन्यांपूर्वी ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि अन्य खेळाडूंनी बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन केले होते, परंतु तेव्हा आश्वासन मिळाली. पण, त्यानंतर पुढे काहीच न झाल्याने खेळाडूंनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावताना हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान कुस्तीपटूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणी लक्ष घालण्याची विंनती केली आहे. आशियाई आणि जागतिक पदक विजेते खेळाडूही या आंदोलनात सहभागी झाले आहेत, असे असतानाही त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी का लक्ष देत नाहीत, असा सवाल बजरंग पुनियाने केला आहे. कुस्तीपटूंचा भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेवरील ( IOA) विश्वास उडाला असल्याचेही खेळाडूंचे म्हणणे आहे. बजरंग पुनिया म्हणाला,'' जेव्हा खेळाडू पदक जिंकतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहता. आता ते रस्त्यावर असतानाही तुम्ही गप्प का?''
#WrestlersProtest 🙏🏽 @CHSurender360pic.twitter.com/0pjb3apPig
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) April 25, 2023
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"