वाह रे वाह... आयपीएल 10 ची धमाकेदार सुरुवात

By Admin | Updated: April 5, 2017 21:32 IST2017-04-05T21:26:46+5:302017-04-05T21:32:11+5:30

भारतीय क्रिकेटमधील वार्षिक उत्सव असलेल्या आयपीएलला आजपासून सुरुवात झाली आहे

Wow ... Wow ... the blasting start of the IPL 10 | वाह रे वाह... आयपीएल 10 ची धमाकेदार सुरुवात

वाह रे वाह... आयपीएल 10 ची धमाकेदार सुरुवात

 ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. 5 -  भारतीय क्रिकेटमधील वार्षिक उत्सव असलेल्या आयपीएलला आजपासून सुरुवात झाली आहे.  हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियम येथे रंगलेल्या सोहळ्यातून स्पर्धेचे औपचारिक उदघाटन झाले. रंगबिरंगी रोषणाई आणि कलाकारांचे नाचगाणे, स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन घडवणारे कार्यक्रम यांनी उदघाटन सोहळ्याच्या भव्यतेचा चार चांद लावले. यावेळी आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांच्याहस्ते सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. व्ही. एस लक्ष्मण या भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.  
स्पर्धेतील सर्व आठ संघांच्या घरच्या मैदानावर रंगलेला उदघाटन सोहळा हे यंदाच्या आयपीएलचे वैशिष्ट्य ठरला. यंदाच्या हंगामातील स्पर्धेला गतविजेते सनरायझर्स हैदराबाद आणि उपविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने सुरुवात झाली आहे.  
 
 
 
 
 

Web Title: Wow ... Wow ... the blasting start of the IPL 10