शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

विश्व यूथ महिला बॉक्सिंग : भारताचा गोल्डन ‘पंच’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 1:23 AM

- किशोर बागडे गुवाहाटी - हरियाणाच्या कन्या नीतू घनघास, ज्योती गुलिया, साक्षी चौधरी, शशी चोप्रा आणि स्थानिक स्टार अंकुशिता बोरो यांनी येथे रविवारी संपलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत देशासाठी सुवर्णमय कामगिरी केली. पाच सुवर्ण आणि दोन कांस्य अशी सात पदके जिंकून भारत अव्वलस्थानी राहिला. सुवर्णविजेत्या सर्व खेळाडूंना प्रत्येकी दोन ...

- किशोर बागडे गुवाहाटी - हरियाणाच्या कन्या नीतू घनघास, ज्योती गुलिया, साक्षी चौधरी, शशी चोप्रा आणि स्थानिक स्टार अंकुशिता बोरो यांनी येथे रविवारी संपलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत देशासाठी सुवर्णमय कामगिरी केली. पाच सुवर्ण आणि दोन कांस्य अशी सात पदके जिंकून भारत अव्वलस्थानी राहिला. सुवर्णविजेत्या सर्व खेळाडूंना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा बीएफआय अध्यक्ष अजय सिंग यांनी केली.कर्मवीर नवीनचंद्र बारडोलाय इन्डोअर स्टेडियममध्ये स्पर्धेच्या अंतिम लढतीत लाईटवेट प्रकारात (४५ ते ४८ किलो) नीतूने कझाकिस्तानची झझिरा उराकबायेव्हावर ५-० असा निर्विवाद विजय नोंदविला. ज्योतीने रशियाच्या, साक्षीने इंग्लंडच्या तसेच शशीने व्हिएतनामच्या प्रतिस्पर्धी बॉक्सरवर ‘गोल्डन पंच’ मारला. जेतेपदासह फ्लायवेट प्रकारात ज्योती पुढील वर्षी होणाºया यूथ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.शशीला फिदर वेटचे सुवर्णमेरो कोमला आदर्श मानणाºया शशी चोप्राने उंचीचा लाभ घेत फिदर वेट प्रकारात (५७ किलो ) व्हिएतनामची डो हाँग इनजाँग हिच्यावर ४-१ असा विजय नोंदवत चौथे सुवर्ण पटकविले. हरियाणातील हिस्सारची रहिवाशी शशीने तिन्ही फेºयांमध्ये इनजाँगवर सरशी साधली.बँटम वेटमध्ये साक्षीला सुवर्णहरियाणाची आणखी एक कन्या साक्षी चौधरी हिने बँटम वेट प्रकारात (५४ किलो) अतिशय कडव्या झुंजीत इंग्लंडची जेन इव्ह स्मिथ हिच्यावर ३-२ असा विजय साजरा करीत तिसरे सुवर्ण जिंकून दिले. साक्षीने अंतिम सामन्यात स्मिथवर पहिल्या आणि तिसºया फेरीत आघाडी घेतल्यामुळेच तिला सुवर्ण जिंकता आले. गुणविभागणीत रेफ्रीने साक्षीचा हात वर करताच भारतीय गोटात प्रचंड जल्लोष झाला.अंकुशिता बोरोबेस्ट बॉक्सरस्पर्धेची आकर्षण ठरलेली अंकुशिताने लाईट वेल्टरवेट (६४ किलो) प्रकारात रशियाची एकेतेरिना दायनिक हिचे आव्हान ४-१ असे मोडीत काढून देशासाठी पाचवे सुवर्ण जिंकले. या स्पर्धेत बेस्ट बॉक्सरचा पुरस्कार अंकुशिताला देण्यात आला.पदक माझ्या व कुटुंबीयांसाठी खास...अंतिम लढत माझ्यासाठी सोपी होती. उपांत्य सामन्याप्रमाणे या लढतीत कस लागला नाही. मार्गदर्शकाच्या डावपेचानुसार खेळल्यामुळे काम सोपे झाले. विश्व स्पर्धेचे हे जेतेपद माझ्या व कुटुंबीयांसाठी ‘खास’ असून यानंतर आॅलिम्पिकच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे’ नीतूने विजयानंतर सांगितले.ज्योतीचाही ‘गोल्डन पंच’चैतन्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या ज्योती गुलियाने फ्लायवेट प्रकारात (५१ किलो) रशियाची एकतेरिना मोल्चानोवा हिच्यावर ५-० ने विजय नोंदवत सुवर्ण जिंकले.

टॅग्स :boxingबॉक्सिंग