वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप : भारताच्या कोनेरु हम्पीने पटकावले ऐतिहासिक जगज्जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 07:45 IST2024-12-30T07:42:37+5:302024-12-30T07:45:46+5:30

"झोप झालेली नव्हती. येथे मी व्यवस्थित झोपू शकलेले नाही. त्यामुळे खेळणे सोपे नव्हते; पण तरीही मिळवलेले विजेतेपद संस्मरणीय आहे. माझी कामगिरी देशवासीयांना प्रेरित करेल."

World Rapid Chess Championship: India's Koneru Humpy wins historic world title | वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप : भारताच्या कोनेरु हम्पीने पटकावले ऐतिहासिक जगज्जेतेपद

वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप : भारताच्या कोनेरु हम्पीने पटकावले ऐतिहासिक जगज्जेतेपद

न्यूयॉर्क : भारताच्या कोनेरू हम्पी हिने GORP रविवारी इंडोनेशियाच्या इरीन सुकंदर हिला पराभूत करताना ऐतिहासिक दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. हम्पीने २०१९मध्ये जॉर्जिया येथे ही स्पर्धा जिंकली होती. भारताची आघाडीची महिला खेळाडू चीनच्या जू वेनजुन हिच्यानंतर एकपेक्षा अधिकवेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी दुसरी खेळाडू आहे. ३७ वर्षीय हम्पीने संभाव्य ११ पैकी ८.५ गुणांसह स्पर्धेचा शेवट केला.

विजयानंतर हम्पी म्हणाली की, मी खूप उत्साहित आहे आणि मला खूप आनंद आहे. मला माहिती होते की एखाद्या ट्रायब्रेकसारखा हा खूप कठीण दिवस असेल. काळ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या या भारतीय खेळाडूने सांगितले की, हे FREED विजेतेपद अगदीच अनपेक्षित आहे. कारण मी वर्षभर संघर्ष करत होतो आणि अनेक स्पर्धांमध्ये मी शेवटचे स्थान मिळवले त्यामध्ये अतिशय खराब कामगिरी केली होती. हम्पीच्या यशासह भारतीय बुद्धिबळासाठी एका अद्भुत वर्षाची अखेर झाली आहे. याआधी डी. गुकेशने सिंगापूर येथे नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून जगज्जेतेपद पटकावले होते. 

सप्टेंबरमध्ये भारताने बुडापेस्ट येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पहिल्यांदाच खुल्या आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. हम्पीने या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले आहे. ती म्हणाली की, मला वाटते की माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. माझे पती आणि आई-वडील यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. जेव्हा मी स्पर्धेसाठी बाहेर देशात जाते तेव्हा माझे आई-वडील माझ्या मुलीचा सांभाळ करतात. ३७व्या वर्षी जगज्जेतेपद पटकावणे सोपे नाही. जसजसे तुमचे वय वाढते तसे ती प्रेरणा टिकवून ठेवणे आणि आवश्यकतेनुसार तंदुरुस्त राहणे अधिक कठीण होते. मी हे करू शकले, याचा आनंद आहे. अनुभवी हम्पी म्हणाली की, पहिल्या फेरीतील पराभवानंतर मी विजेतेपदाबाबत विचारच केला नव्हता; पण त्यानंतर खेळ चांगला होत गेला आणि काल चार सामने जिंकण्यास मदत मिळाली. देशातील युवकांना मिळेल प्रेरणा हम्पीला भारत आणि अमेरिकेतील मोठ्या अंतरामुळे खेळाबाहेरच्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. ती म्हणाली की, वेळेच्या फरकामुळे हा दौरा माझ्यासाठी अतिशय कठीण होता. 

-  झोप झालेली नव्हती. येथे मी व्यवस्थित झोपू शकलेले नाही. त्यामुळे खेळणे सोपे नव्हते; पण तरीही मिळवलेले विजेतेपद संस्मरणीय आहे. माझी कामगिरी देशवासीयांना प्रेरित करेल.
-  देशातील अनेक तरुणांना डी. गुकेश आणि माझ्यामुळे व्यावसायिक बुद्धिबळ खेळण्याची प्रेरणा मिळेल. रशियाच्या १८ वर्षीय व्होलोडर मुर्जिनने पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले.

महिला वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल कोनेरु हम्पीचे मनापासून अभिनंदन. तिची चिकाटी आणि प्रतिभा लाखो लोकांना प्रेरणा देईल. हा विजय ऐतिहासिक आहे, कारण हे तिचे दुसरे विजेतेपद आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: World Rapid Chess Championship: India's Koneru Humpy wins historic world title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.