शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक नेमबाजी: युवा नेमबाजांकडून ‘डबल गोल्ड’ धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 02:58 IST

मनू- सौरभ, दिव्यांश- अंजुम यांचा सुवर्ण वेध

बीजिंग : भारताच्या युवा नेमबाजांनी आयएसएसएफ विश्वचषकात गुरुवारी मिश्र प्रकारातील दोन्ही सुवर्ण पदके जिंकून स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वर्चस्व गाजविले. मनू भाकर- सौरभ चौधरी यांनी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्यानंतर दिव्यांशसिंग पनवार याने अनुभवी अंजुम मोदगिल हिच्या सोबतीने दहा मीटर एअर रायफल प्रकारात आणखी एक सुवर्ण जिंकून पदक तालिकेत देशाला अव्वल स्थान मिळवून दिले.तिसºया दिवसाच्या खेळाची सुरुवात नवी जोडी, नवा प्रकार आणि नव्या निकालाने झाली. केवळ दुसरी वरिष्ठ स्पर्धा खेळत असलेल्या दिव्यांशने अनुभवी मोदगिलच्या सोबतीने दहा मीटर एअर रायफल फायनलमध्ये लियू रूचसुआन- यांग हाओरन या चीनच्या जोडीला १७-१५ असे मागे टाकून सुवर्ण जिंकून दिले. आंतरराष्टÑीय नेमबाजी महासंघाने बीजिंग स्पर्धेपासून मिश्र प्रकारात खेळाचे नवे सूत्र लागू केल्यामुळे भारतीय जोडीचे हे यश विशेष असे आहे. मोदगिल- पवार यांनी ५२२.७ गुणांसह सहावे स्थान घेत अंतिम फेरीची पात्रता गाठली होती.सुवर्ण पदकाच्या लढतीत भारतीय जोडी एकवेळ ११-१३ ने मागे होती. नंतर मुसंडी मारुन सुवर्णावर नाव कोरले. अपूर्वी चंदेला- दीपक कुमार या अन्य भारतीय जोडीने पात्रता फेरीत ५२२.८ गुण घेत पाचवे स्थान पटकविले. फायनलमध्ये दोघेही माघारताच ही जोडी सहाव्या स्थानी राहिली. मनू- सौरभ यांनी दहा मीटर एअर पिस्तुल अंतिम लढतीत चीनचे जियांग रँक्सिन- पांग पेई यांचा १६-६ असा पराभव केला. भारतीय जोडीने ४८२ गुण घेत पाचव्या स्थानासह अंतिम फेरी गाठली. मनू- सौरभ यांचे दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारातील हे दुसरे सुवर्ण ठरले.दोघांनी नवी दिल्लीत फेब्रुवारीत आयएसएसएफ विश्व चषकात सुवर्ण जिंकले होते. मनू बुधवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात अपात्र ठरली होती. दहा मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात हीना सिद्धू- रिझवी शहजार ही भारतीय जोडी ४७९ गुणांसह पात्रता फेरीत १२ व्या स्थानावर राहील्याने अंतिम फेरी गाठू शकली नाही. नव्या प्रकारात अव्वल ८ संघ फायनलसाठी पात्र ठरतात. २२पुरुषांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात पात्रता फेरीत आदर्शसिंग २९० गुणांसह १५ व्या, अनिश भानवाला २८९ गुणांसह १७ व्या आणि अर्पित गोयल२८८ गुणांसह २२ व्या स्थानी राहिला. या प्रकारात एकूण ५७ नेमबाज सहभागी झाले आहेत.