अफगाणिस्तान जिंकेल यंदाचा वर्ल्डकप - रोबोटचे भाकित

By Admin | Updated: February 11, 2015 15:41 IST2015-02-11T15:41:25+5:302015-02-11T15:41:25+5:30

यावर्षीचा वर्ल्डकप अफगाणिस्तानचा संघ जिंकेल असे भाकित न्यूझिलंडमधील एका रोबोटने व्यक्त केले आहे.

World Cup for Afghanistan Wins - Robot predicted | अफगाणिस्तान जिंकेल यंदाचा वर्ल्डकप - रोबोटचे भाकित

अफगाणिस्तान जिंकेल यंदाचा वर्ल्डकप - रोबोटचे भाकित

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - शनिवारपासून सुरु होणा-या वर्ल्डकपच्या सामन्यांकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असतानाच यावर्षीचा वर्ल्डकप अफगाणिस्तानचा संघ जिंकेल असे भाकित न्यूझिलंडमधील एका रोबोटने व्यक्त केले आहे.
अफगाणिस्तान संघाचा पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यात आला असून तो पहिल्यांदाच वर्ल्डकपचे सामने खेळताना दिसणार आहे. रोबोटच्या या भाकितामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. न्यूझिलंडमधील कँटरबुरी विद्यापीठातील एचआयटी लॅबच्या एका विद्यार्थ्याने विकसित केलेल्या या रोबोटने हे भाकित केले आहे. हो, रोबोटने केलेले भाकित खरे वाटत नसले तरी या रोबोटमध्ये भाकित वर्तविण्याचे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम आपण करीत असून क्रिकेटमध्ये नेहमीच अनपेक्षित निकाल लागल्याचे सांगत एकप्रकारे रोबोटच्या भाकिताला दुजोरा देण्याचे काम एड्यूअर्डो सँडोव्हल या विद्यार्थ्याने केले. मॅक्सीअन-सीरियनचा तत्वज्ञानी इकरम अंटाकी यांच्या नावावरुन आपण रोबोटचे नाव इकरम ठेवले आहे. २०१० साली झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपवेळी ऑक्टोपसने जी भविष्यवाणी वर्तविली होती त्यातून आपल्याला ही प्रेरणा मिळाली असल्याचे सँडोव्हलने सांगितले. वर्ल्डकपच्या सामन्याला शनिवारी सुरुवात होणार असून न्यूझिलंडविरुध्द श्रीलंका यांच्यात पहिला सामना होणार आहे. दरम्यान, बुधवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारताने अफगाणिस्तान संघाचा १५३ धावांनी पराभव केला होता.

Web Title: World Cup for Afghanistan Wins - Robot predicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.