World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:11 IST2025-09-17T17:03:25+5:302025-09-17T17:11:51+5:30

World Athletics Championships 2025  Neeraj Chopra Enter Final : अंतिम सामन्यात पाकच्या खेळाडूसोबत पाहायला मिळू शकते तगडी फाइट

World Athletics Championships 2025 Javelin Qualifier Defending champion Neeraj Chopra has qualified for Thursday's World Athletics Championship Final First Attempt Now Focus On Pakistan Arshad Nadeem May Be IND vs PAK Final Fight | World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

World Athletics Championships 2025  Neeraj Chopra Enter Final : भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा याने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात  ८४.८५ मीटर भाला फेकत नीरजनं फायनलचं तिकीट पक्के केले. थेट फायनल गाठण्यासाठी  ८४.५० मीटर भाला फेकण्याची मर्यादा होती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नीरज चोप्राला इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

'अ' गटातून थेट पात्र ठरणाऱ्या तिघांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकवर राहिला. पण बाकीच्या प्रतिस्पर्धकांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रयत्न करावे लागले. आता १८ सप्टेंबरला नीरज चोप्रा फायनलमध्ये सर्वोत्तम कामगिरीसह सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सलग दोन वेळा ही स्पर्धा गाजवत नीरज चोप्राकडे इतिहासात रचण्याची संधी आहे. याआधी त्याने २०२३ मध्ये बुडापेस्ट येथे सुवर्णपदक पटकावले होते. याआधी फक्त दोघांनीच ही स्पर्धा सलग दोनवेळा गाजवलीये.  

फायनलमध्ये IND vs PAK असा सामना पाहायला मिळणार?

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलमध्ये भारत-पाक असा सामना रंगल्याचे पाहायला मिळू शकते. कारण पात्रता फेरीतील 'ब' गटातून पाकिस्तानचा ऑलिंपिक विजेता अर्शद नदीम मैदानात उतरणार आहे. त्याच्यासह या गटात माजी विजेता अँडरसन पीटर्सचाही समावेश आहे. जर पाकच्या नदीमनं फायनल गाठली तर या स्पर्धेतील फायनलमध्ये IND vs PAK असा सामना पाहायला मिळू शकतो.  २०२४ मध्ये पॅरिस ऑलिंपिकनंतर पहिल्यांदाच हे दोघे समोरा समोर येतील. पॅरिसमध्ये अर्शदने ९२.९७ मीटर थ्रोसह सुवर्ण पदक पटकावले होते.  त्यावेळी  नीरजला ८९.४५ मीटरसह रौप्यवर समाधान मानावे लागले होते. याचा हिशोब चुकता करून नीरज चोप्रा आपल्या जेतेपदाचा बचाव करताना दिसेल.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 'अ' गटातील पात्रता फेरीत कुणी किती मीटर टाकला भाला
 

खेळाडूदेशकामगिरी (Mark)स्थितीप्रयत्न 1प्रयत्न 2प्रयत्न 3
जुलियन वेबरजर्मनी (GER)८७.२१मीपात्र (Qualified)८२.२९मी८७.२१मी
डाविड वेगनरपोलंड (POL)८५.६७मीपात्र (वैयक्तिक सर्वोत्तम)७९.७२मी७३.९७मी८५.६७मी
नीरज चोप्राभारत (IND)८४.८५मीपात्र (Qualified)८४.८५मी
याकुब वॅडलजेकझेक प्रजासत्ताक (CZE)८४.११मीहंगामातील सर्वोत्तम (Season Best)८०.४६मी८४.११मी
केशॉर्न वॉलकॉटत्रिनिदाद आणि टोबॅगो (TTO)८३.९३मी८३.९३मी७७.६१मीX
सचिन यादवभारत (IND)८३.६७मी८०.१६मी८३.६७मी८२.६३मी

Web Title: World Athletics Championships 2025 Javelin Qualifier Defending champion Neeraj Chopra has qualified for Thursday's World Athletics Championship Final First Attempt Now Focus On Pakistan Arshad Nadeem May Be IND vs PAK Final Fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.