महिला हॉकी : चौथ्या कसोटीत भारताची बेलारूसवर २-१ ने मात

By Admin | Updated: March 7, 2017 00:49 IST2017-03-07T00:49:42+5:302017-03-07T00:49:42+5:30

भारतीय महिला संघाने सोमवारी चमकदार कामगिरी करताना पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बेलारूसवर सलग चौथा विजय मिळवला.

Women's hockey: India beat Belarus 2-1 in the fourth Test | महिला हॉकी : चौथ्या कसोटीत भारताची बेलारूसवर २-१ ने मात

महिला हॉकी : चौथ्या कसोटीत भारताची बेलारूसवर २-१ ने मात


भोपाळ : भारतीय महिला संघाने सोमवारी चमकदार कामगिरी करताना पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बेलारूसवर सलग चौथा विजय मिळवला. भारताने आज २-१ ने सरशी साधली. कर्णधार राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने रेणुका यादवच्या (सहावा मिनीट) मैदानी गोलच्या जोरावर आघाडी घेतली. गुरजीत कौरने १२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पाहुण्या संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये चांगला खेळ केला. नतासिया सिरायेझकाने २१ व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवला. त्यानंतर भारतीय संघाने बचाव अभेद्य करीत बेलारूस संघाला गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Women's hockey: India beat Belarus 2-1 in the fourth Test