महिलादिनी खुशखबर !
By Admin | Updated: March 8, 2015 02:58 IST2015-03-08T02:58:30+5:302015-03-08T02:58:30+5:30
सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सायनाने आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये आपली जागा निश्चित करून जागतिक महिलादिनी तमाम भारतीयांना खुशखबर दिली आहे़

महिलादिनी खुशखबर !
सायनाने रचला इतिहास
बर्मिंघम : सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सायनाने आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये आपली जागा निश्चित करून जागतिक महिलादिनी तमाम भारतीयांना खुशखबर दिली आहे़ विशेष म्हणजे स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी सायना पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे़
सायना नेहवाल हिने आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला़ सायनाने चीनच्या सून यू हिचा २१-१३, २१-१३ अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.