शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षांचे बाबा, ४९ वर्षांची मुलगी अन् १७ वर्षांचा नातू! मल्लखांबाचा वारसा जपणारं कुटूंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 14:04 IST

वडिलांकडून प्रेरणा घेऊन लेकीने सुरू केला प्रवास

3 generations and Mallakhamb sports | कोणतेही क्षेत्र असो 'ती' आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहते आहे. आपल्या कर्तृत्वाने नवं क्षितिज गाठू पाहणाऱ्या वैशाली जोशी या मैदानावरच्या रणरागिणीचा मल्लखांबाचा लक्षवेधी प्रवास जाणून घेताना विलक्षण जिद्द, कठोर व अविरत परिश्रम, जबरदस्त आत्मविश्वास याचा सुरेख समन्वय दिसून येतो. व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या वैशाली यांचा  मल्लखांबाचा प्रवास त्यांच्या वडिलांच्या प्रेरणेतून सुरु झाला.

व्यवसाय आणि खेळ याची अचूक सांगड घालत या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या दमाच्या तरुणांना त्यांच्याकडून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे. वेगवेगळ्या प्रसंगात कुटुंबाकडून आपल्या प्रत्येकालाच माया, दिलासा, शाबासकी, धीर, पाठिंबा असे बरेच काही मिळालेले असते. आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या याच पाठिंब्यावर वैशाली खेडकर जोशी यांनी मल्लखांबाचा लक्षवेधी प्रवास साध्य करत प्रत्येक 'ती' ला आत्मबलाची दिशा दाखविली आहे. आपल्या वडिलांचा आदर्श ठेवत आजही मल्लखांबाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्या कार्यरत आहेत. वैशाली यांचे वडील सुधाकर खेडकर वयाच्या ८०व्या वर्षीही मल्लखांब खेळतायेत. एवढंच नाही तर वैशाली यांचा मुलगा शार्दूल ही मल्लखांबाचे धडे गिरवत यात काही करू पाहतो आहे.

वेगळा ध्यास घेत काहीतरी साध्य करू पाहताना कुटुंबही जेव्हा त्यात सहभागी होते तेव्हा तो अविष्कार अधिकच व्यापक होतो. कलाशीर्वाद लाभलेलं हे कुटुंब सध्या मल्लखांबासारख्या मराठमोळ्या खेळामध्ये रंगलंय. मल्लखांबाच्या अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत, रशियात भारताचे प्रतिनिधित्व करून अनेक सन्मान वैशाली यांनी मिळवले आहेत. वैशाली यांचे वडील आणि मुलगा यांनीही अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. नुकत्याच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे घेतल्या गेलेल्या उज्जेन येथे झालेल्या ‘खेलो  इंडिया २०२३’ या स्पर्धेत  दोन  रौप्य आणि एक कास्य पदक शार्दूलने मिळवलं आहे. माझे आजोबा माझ्या आईसाठी प्रेरणा ठरले तर माझी आई माझ्यासाठी.आमचं नातं आई मुलाचं असलं तरी मैदानात आम्ही एकमेकांचे स्पर्धक आणि मार्गदर्शक असल्याचं तो सांगतो.

आपल्या या वेगळ्या प्रयत्नाबद्दल बोलताना वैशाली सांगतात, काहीतरी वेगळं करण्यासाठी तुमच्या आयुष्यात, तुमच्या करिअरमध्ये अनेक प्रेरणादायी गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक अनुभव तुम्हाला काही देऊ पाहत असतो, तुमच्यात सूक्ष्म का होईना, पण काहीतरी बदल घडवण्याची क्षमता त्यात असते. माझ्या  लहानपणापासून माझ्या आई - वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेने १९८७ सालापासून मी मल्लखांबाच प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आज एवढ्या वर्षाच्या अनुभवनानंतरही प्रशिक्षणार्थी याच नात्याने नव्या जोमाने प्रत्येक स्पर्धेत मी सहभागी होत असते. खेळाडूंच्या चमकदार कामगिरीविषयी वाचताना त्यांचा खडतर असलेला प्रवासही लक्षात घ्यायला हवा  हे त्या आवर्जून सांगतात.  जोडीदार, कौटुंबिक जबाबदऱ्या, नातेवाईक आणि करियर यातलं कोणतंही कारण मध्ये न येऊ देता आपल्यालाच आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळल पाहिजे. विशेषतः स्त्रियांनी जर असा पुढाकार घेतला तर संपूर्ण कुटुंबाचा दृष्टिकोन बदलू शकतो असं त्यांना वाटत. स्पर्धात्मक खेळांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवायचा असेल, तर आज खरोखर गरज आहे ती एकूणच व्यायाम, खेळ, क्रीडांगणामधील सहभाग वाढवण्याची.

मल्लखांब क्षेत्रात काही तरी अभिनव प्रयोग व्हावेत आजच्या तरुण पिढीने धाडसाने यात काही करावं यासाठी वैशाली यांची धडपड सुरु आहे. याचा एक भाग म्हणून ‘महाराष्ट्र मल्लखांब असोसिएशन’ च्या वतीने ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यात विशेष रोख पारितोषिकासह त्यांच्या वडिलांच्या नावाचे खास मानचिन्ह त्यांनी गेल्यावर्षी पासून द्यायला सुरुवात केली आहे. आपले मोलाचे मार्गदर्शन येणारया पिढीला मिळावे यासाठी विविध लेख तसेच खेळाविषयीच्या चर्चासत्रांमधून वैशाली यांनी मल्लखांबाची दोरी सक्षम करण्याचा ध्यास घेतला आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन