शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

महिला गटात मुंबई अजिंक्य

By admin | Updated: August 16, 2016 00:33 IST

अंतिम सामन्यात पिछाडीवर असणाऱ्या मुंबई संघाने जबरदस्त खेळ करत ठाणे संघाला २-१ असे नमवले. या विजयाच्या जोरावर मुंबई संघाने ५२ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम

मुंबई : अंतिम सामन्यात पिछाडीवर असणाऱ्या मुंबई संघाने जबरदस्त खेळ करत ठाणे संघाला २-१ असे नमवले. या विजयाच्या जोरावर मुंबई संघाने ५२ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम स्पर्धेत महिला गटाचे अजिंक्यपद पटकावले. तर पुरुष गटात झालेल्या स्पर्धेत पुणे संघाने मुंबईविरुद्ध बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली. ठाणे येथील खारकर आळी येथे रंगलेल्या स्पर्धेत निर्णायक सामन्यात राधिका जोशीने संगीता चांदोरकरचा २५-१६, २५-१२ असा पराभव करत यजमान ठाणे संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्याच एकेरीत मुंबईच्या प्रीती खेडेकरने प्रगती बिर्जेवर २५-१२, २५-० असा विजय मिळवत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक दुहेरी सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बोर्डावर दमदार सुरुवात केली. मात्र मुंबईच्या अनुपमा केदार-नीलम घोडके यांनी अनुभवाच्या जोरावर विणा चव्हाण-मिताली पिंपळे जोडीवर २५-०, २०-२५, २५-२ अशी मात करत मुंबईला अजिंक्य बनवले. पुरुष गटात मुंबईला पुणेकडून पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या एकेरीत अनिल मुंढेने योगेश धोंगडेचा २-० असा पराभव करत सामन्याला विजयी सुरुवात केली. तर मुंबईच्या संदीप देवरूखकरने बोर्डावर दमदार कामगिरी करत २-१ अशा फरकाने योगेश परदेशीला नमवले. मात्र दुहेरीत पुणेकर वसंत वैराळ-गणेश तावरे जोडीने रियाज अकबर अली-विकास धारियालाा २-१ असे नमवले. पुरुष एकेरीत सत्यनारायण दोंतूलने अग्रमानांकित पंकज पवारला २५-११, २५-० असे नमवत स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. तर जितेंद्र काळे आणि प्रमोद शेवाळे यांनी अनुक्रमे ठाण्याच्या भरत मते (२-०) व जळगावच्या झुबैर सय्यद (२-१)वर विजय मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)