महिला आर्चरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतून बोम्बायला देवी बाहेर
By Admin | Updated: August 11, 2016 19:05 IST2016-08-11T18:57:31+5:302016-08-11T19:05:06+5:30
महिला आर्चरीच्या व्यक्तिगत सामन्याच्या उपउपांत्यपूर्व फेरीतून भारताच्या बोम्बायला देवीचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

महिला आर्चरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतून बोम्बायला देवी बाहेर
>ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 11 - महिला आर्चरीच्या व्यक्तिगत सामन्याच्या उपउपांत्यपूर्व फेरीतून भारताच्या बोम्बायला देवीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मेक्सिकोच्या वेलंसिया अलाजेंद्रानं बोम्बायला देवीचा 2-6 अशा फरकानं पराभव केला आहे. यासोबत बोम्बायला देवीचा ऑलिम्पिकमधला प्रवास संपल्यात जमा आहे. रिओ ऑलिम्पिकमधल्या पाचव्या दिवसाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली आहे.
उपउपांत्यपूर्व सामना जिंकला असता, तर बोम्बायला उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झाली असती. याआधी दोन सामने बोम्बायला देवीनं जिंकले होते. उपउपांत्यपूर्व फेरीत तिला व्हेलेन्सियाचे कडवे आव्हान असतानाच तिनं पहिल्या सेटमध्ये व्हेलेन्सियानं बॉम्बयलाचा दोन गुणांनी पराभव केला.
दुसरा सेट जिंकत बॉम्बयलाने बरोबरीत राहण्याचा प्रयत्न केला. मात्र तिस-या सेटमध्ये अवघ्या एका गुणाने तिने हा सेट गमावला.