शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकप जिंकण्यासाठी ‘तीन अच्छे दिन’ची गरज

By admin | Updated: January 22, 2015 00:19 IST

भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी फक्त तीन चांगल्या दिवसांची गरज असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांने व्यक्त केले.

राहुल द्रविड : धोनी, विराट एकटेच सामन्याचा निकाल फिरवू शकतातनवी दिल्ली : भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी फक्त तीन चांगल्या दिवसांची गरज असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांने व्यक्त केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात हा शैलीदार फलंदाज बोलत होता.द्रविड म्हणाला, ‘या विश्वचषक स्पर्धेचे स्वरूपच असे आहे की, अग्रस्थानावरील सर्व संघांना उपांत्यफेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी आपल्याला तीन चांगल्या दिवसांची गरज असणार आहे. आपल्याकडे महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली आहेत की, जे एकटेच सामन्याचा निकाल फिरवू शकतात.’द्रविड म्हणाला, ‘हे सर्व सहज आणि सोपे आहे, असे माझे मत नाही. हा प्रवास कठीण असणार आहे. मात्र, व्यक्तिगत कामगिरीच्या बाबतीत आपण भाग्यवान असू. त्यामुळेच आपण विश्वचषक जिंंकू शकतो.’भारत-आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी केव्हा जिंकेल? या प्रश्नावर बोलताना द्रविड म्हणाला की, मलाही याचे उत्तर हवे आहे. कसोटीतील घटती प्रेक्षक संख्या हा चिंतेचा विषय असून, यासाठी दिवस-रात्र कसोटी खेळविण्याच्या पर्यायाचा विचार व्हायला हवा, असेही तो म्हणाला.द्रविड म्हणाला, ‘सध्याच्या परिस्थितीत आपली कामे सोडून कोणी पाच दिवस सामना पाहायला येईल हे मला कठीण वाटते. त्यामुळेच दिवस-रात्र कसोटीचा पर्याय मला योग्य वाटतो. यामुळे प्रेक्षकांच्या संख्येत भर पडेल असे मला वाटते, असेही द्रविड म्हणाला.(वृत्तसंस्था)सरितादेवीच्या कृतीचे समर्थन नाहीभारतीय महिला मुष्ठियोद्धा सरितादेवीने इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक घेण्यास नकार दिला होता. मात्र, सरितादेवीची ही कृती योग्य नव्हती, असे राहुल द्रविडचे मत आहे. अंक देण्याच्या वादग्रस्त पद्धतीमुळे सरितादेवीला कोरियाच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला होता. द्रविड म्हणाला, ‘मुष्ठियुद्धामध्ये अंक देण्याची पद्धत कशी आहे, हे मला माहीत नाही. उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे तिच्या मन:स्थितीची मला जाणीव आहे. मात्र, त्यानंतर २४ तासांनी झालेल्या कार्यक्रमात पदक न स्वीकारण्याच्या कृतीचे मी समर्थन करू शकत नाही. मला ही गोष्ट योग्य वाटत नाही.