विम्बल्डन जोड

By Admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:03+5:302014-06-20T21:25:03+5:30

मरेला उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेरर किंवा क्विन्स क्लब चॅम्पियन ११ वा मानांकित ग्रगोर दिमित्रोव्ह यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. २०११ मध्ये जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या अव्वल मानांकित जोकोव्हिचला सोमवारी कजाखस्तानच्या आंद्रेई ग्लुबेव्हविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. सर्बियाच्या या खेळाडूला चौथ्या फेरीत फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगा किंवा उपांत्यपूर्व फेरीत माजी उपविजेता टॉमस बर्डीचच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. फेडरर व नदाल यांच्या पहिल्या फेरीच्या लढती मंगळवारी होणार आहेत.

Wimbledon pair | विम्बल्डन जोड

विम्बल्डन जोड

ेला उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेरर किंवा क्विन्स क्लब चॅम्पियन ११ वा मानांकित ग्रगोर दिमित्रोव्ह यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. २०११ मध्ये जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या अव्वल मानांकित जोकोव्हिचला सोमवारी कजाखस्तानच्या आंद्रेई ग्लुबेव्हविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. सर्बियाच्या या खेळाडूला चौथ्या फेरीत फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगा किंवा उपांत्यपूर्व फेरीत माजी उपविजेता टॉमस बर्डीचच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. फेडरर व नदाल यांच्या पहिल्या फेरीच्या लढती मंगळवारी होणार आहेत.
सातवेळा विम्बल्डन विजेतेपद पटकाविण्याच्या पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी साधणाऱ्या फेडररला पहिल्या फेरीत इटलीच्या पाउलो लारेंजीविरुद्ध लढत द्यावी लागेल.
महिला विभागात पाचवेळा विजेतेपदाचा मान मिळविणारी अव्वल मानांकित सेरेना विलियम्स व २००४ ची चॅम्पियन मारिया शारापोव्हा यांना ड्रॉच्या एकाच क्वार्टरमध्ये स्थान मिळाले आहे. २००४ च्या अंतिम फेरीत सेरेनाचा पराभव करणाऱ्या मारिया शारापोव्हाला पहिल्या फेरीत विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळविणाऱ्या ब्रिटनच्या समंथा मरेविरुद्ध लढत द्यावी लागेल तर सेरेनाला सलामीला जॉर्जियाच्या अन्ना तताशविलीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
फे्रंच ओपन उपविजेती सिमोना हालेपला सलामीला येलेना यांकोव्हिचविरुद्ध लढत द्यावी लागणार असून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काला ॲग्निस्का रदवांस्काच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Wimbledon pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.