शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:31 IST

सातवेळचा विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोविचला विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकत नवा इतिहास रचण्याची संधी आहे.

जेव्हा जेव्हा एखादी ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू होते तेव्हा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला त्याच्या निवृत्तीबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात; परंतु या दिग्गज खेळाडूचे डोळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डन विजेतेपदावर आहेत. विक्रमी २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याचे त्याने म्हटले आहे.

 तुझी ही अखेरची स्पर्धा असेल का? जोकोविच म्हणाला की, ...

जोकोविच आता ३८ वर्षांचा आहे आणि विम्बल्डनच्या आधी त्याला हाच प्रश्न विचारण्यात आला की, तुझी ही अखेरची स्पर्धा असेल का? २४ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्यानेही उत्तर आधीच ठरवलेले होते. जोकोविच म्हणाला की, ही माझी शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असेल का? मी याबद्दल आताच काहीही निश्चितपणे सांगू शकत नाही. पुढच्या वर्षी मी फ्रेंच ओपन किंवा इतर कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत भाग घेईन की नाही, याची मला खात्री नाही. माझी इच्छा पुढील अनेक वर्षे खेळण्याची आहे. अलेक्झांडर मुलरविरुद्ध सलामीची लढत

विम्बल्डनमध्ये सातवेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच म्हणाला की, विम्बल्डनमध्ये पुन्हा विजेता होण्याची ही माझी सर्वोत्तम संधी असू शकते, यावर मी सहमत आहे. ते परिस्थितीवर अवलंबून असेल; पण सध्या मला खूप चांगले वाटत आहे. मंगळवारी पहिल्या फेरीत जोकोविचचा सामना अलेक्झांडर मुलरशी होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त राहण्याची माझी इच्छा आहे. हे माझे ध्येय आहे; आयुष्याच्या या टप्प्यावर पुढे काय होईल, हे तुम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. जोकोविचने कबूल केले की, ऑल इंग्लंड क्लब त्याला आणखी एक ग्रँडस्लॅम एकेरी जेतेपद जिंकण्याची सर्वोत्तम संधी देऊ शकतो. ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीतील एकूण २५ जेतेपदे होतील. हा असा आकडा आहे जो कोणत्याही खेळाडूला आलेला नाही.  

यानिक सिन्नरचे कडवे आव्हान

जोकोविच आणि अल्काराझसमोर विम्बल्डनमध्ये जगातील अव्वक क्रमांकाचा खेळाडू यानिक सिन्नरचे कडवे आव्हान असेल. उपांत्य फेरीत जोकोविचला कदाचित सिन्नरचा सामना करावा लागू शकतो तर अंतिम फेरीत अल्काराझचे आव्हान असू शकेल. विम्बल्डनमध्येही अल्काराझ-सिन्नर यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते.

अलेक्झांडर मुलरविरुद्ध सलामीची लढत

विम्बल्डनमध्ये सातवेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच म्हणाला की, विम्बल्डनमध्ये पुन्हा विजेता होण्याची ही माझी सर्वोत्तम संधी असू शकते, यावर मी सहमत आहे. ते परिस्थितीवर अवलंबून असेल; पण सध्या मला खूप चांगले वाटत आहे. मंगळवारी पहिल्या फेरीत जोकोविचचा सामना अलेक्झांडर मुलरशी होईल.

अल्काराझची नजर तिसऱ्या जेतेपदावर

स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझ सोमवारी विम्बल्डनमध्ये सेंटर कोर्टवर पहिल्या फेरीत फॅबियो फोगनिनीचा सामना करेल. त्याची नजर सलग तिसऱ्या विम्बल्डन ग्रँडस्लॅमवर असेल. १९६८ मध्ये सुरू झालेल्या ओपन युगात फक्त चार खेळाडूंनी सलग तीन वेळा विम्बल्डन ट्रॉफी जिंकली आहे. त्यात ब्योर्न बोर्ग, पीट सॅम्प्रस, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांचा समावेश आहे. सहा वर्षांपूर्वी २२ वर्षीय अल्काराझने येथे ग्रास कोर्टवर पहिला सामना खेळला होता. फक्त मागील वर्षीच्या पुरुष विजेत्याला सेंटर कोर्टवर पहिला सामना खेळण्याची संधी मिळते. अल्काराझचा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये ५-० असा विक्रम आहे, ज्यामध्ये दोन फ्रेंच ओपन जेतेपदांचा समावेश आहे. अमेरिकन ओपनमध्येही अल्काराझ एकदा विजेता ठरला आहे. अल्काराझने तीन आठवडे आधी फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत जगातील अव्वल खेळाडू यानिक सिन्नरला दोन सेटच्या पिछाडीवरून पराभूत करताना विजेतेपद पटकावले होते. 

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिसWimbledonविम्बल्डन