शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांना फिफा विश्वचषक, ऑलिम्पिकपासून ‘वाडा’ रोखणार? वाडाला ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा अधिकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 06:14 IST

२०२७ चा फुटबॉल विश्वचषक, २०२८ ला लॉस एंजिलिस ऑलिम्पिक आणि २०३४ ला हिवाळी ऑलिम्पिक अमेरिकेत होत आहेत. ट्रम्प यांच्याआधीचे ज्यो बायडेन प्रशासन आणि अमेरिकेची डोपिंगविरोधी संस्था वाडाच्या विरोधात राहिली आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अमेरिकेतच आयोजित होणाऱ्या फिफा विश्वचषक, लॉस एंजिलिस ऑलिम्पिक आणि २०३४ च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास बंदीचा सामना करावा लागू शकतो. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी विश्व डोपिंगविरोधी एजन्सी (वाडा) असा नियम लागू करण्याचा विचार करीत आहे.

२०२७ चा फुटबॉल विश्वचषक, २०२८ ला लॉस एंजिलिस ऑलिम्पिक आणि २०३४ ला हिवाळी ऑलिम्पिक अमेरिकेत होत आहेत. ट्रम्प यांच्याआधीचे ज्यो बायडेन प्रशासन आणि अमेरिकेची डोपिंगविरोधी संस्था वाडाच्या विरोधात राहिली आहे.

मंगळवारी वाडाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. वादाच्या केंद्रस्थानी असलेला विषय म्हणजे अमेरिकेने २०२४ आणि २०२५ चे ७.३ दशलक्ष डॉलरचे वार्षिक शुल्क वाडाकडे जमा केलेले नाही. चीनचे जलतरणपटू अमली द्रव्य सेवनात पॉझिटिव्ह आढळूनही त्यांना स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देण्यात आली होती. वाडाच्या भूमिकेचा विरोध म्हणून अमेरिकेने शुल्क रोखून ठेवले. वाडाचे प्रवक्ते जेम्स फिट्झगेराल्ड यांच्यानुसार, हा नियम पारित झाल्यास तो अमेरिकेसाठी घातक ठरणार आहे.

ट्रम्प यांना त्यांच्याच देशात रोखले जाईल?बायडेन प्रशासनात डोपिंग प्रकरणांचे प्रमुख राहिलेले राहुल गुप्ता आणि त्यांची उत्तराधिकारी सारा कार्टर यांनी हा प्रस्ताव ‘हास्यास्पद’ ठरविला. गुप्ता म्हणाले, ‘ही सरकारची जबाबदारी आहे, वाडाची नाही. वाडा अशा नियमांद्वारे कोणत्याही सरकारच्या, विशेषतः यजमान देशाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचे दिसते. हे कोणत्याही सरकारसाठी चिंतेचे कारण ठरू शकते.’

वाडाला ट्रम्पवर बंदी घालण्याचा अधिकार?ऑलिम्पिक आणि विश्वचषकासारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व संबंधितांना वाडाच्या नियमांचे पालन करण्याची अट मान्य करावी लागते. हे नियम डोपिंगशी संबंधित असोत किंवा प्रशासकीय बाबींशी संबंधित असोत. युनेस्कोसोबतच्या करारानुसार सरकारांना वाडाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. या करारात शुल्क भरणे आणि नियमांचे पालन करणे याचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Could WADA Ban Trump from FIFA World Cup, Olympics?

Web Summary : WADA considers banning Trump, officials from US-hosted events over unpaid dues. US opposition to WADA's stance on Chinese swimmers' doping is a factor. The proposal is controversial, raising concerns about WADA's overreach into government affairs, especially of host nations.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Olympicsऑलिंपिक