शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई खाते उघडणार?

By admin | Updated: April 19, 2015 01:10 IST

सलग चार पराभवांचे तोंड पाहणाऱ्या मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये रॉयल चॅलेजंर्स बेंगळुरूविरुद्ध विजयाचा स्वाद चाखता येईल? संघाच्या चाहत्यांना हा प्रश्न सारखा त्रस्त करीत आहे.

बेंगळुरू : सलग चार पराभवांचे तोंड पाहणाऱ्या मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये रॉयल चॅलेजंर्स बेंगळुरूविरुद्ध विजयाचा स्वाद चाखता येईल? संघाच्या चाहत्यांना हा प्रश्न सारखा त्रस्त करीत आहे. गेल्या सत्रात मुंबईची स्थिती अशीच होती. ओळीने पाच सामने गमावल्यानंतरही या संघाने उपांत्य फेरीत धडका दिली. पण चेन्नईने नंतर त्यांना स्पर्धेबाहेर ढकलले.विजयाचे खाते न उघडू शकलेला मुंबई एकमेव संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्स पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नईने या संघाला धुतले. योग्य संयोजनाअभावी हा संघ माघारला. कर्णधार रोहित शर्मा, अ‍ॅरोन फिंच, पार्थिव पटेल आणि विंडीजचा लेंडल सिमन्स हे आघाडीचे फलंदाज फार काही करू शकले नाही. चेन्नईविरुद्ध काल फलंदाजीत बदल करूनही यश मिळाले नव्हते. कोरी अ‍ॅन्डरसन तिसऱ्या स्थानावर आला; पण चारच धावा काढू शकला. १२ धावांत तीन गडी गमावणाऱ्या मुंबईला वरच्या स्थानावर आलेल्या भज्जीने संकटातून बाहेर काढले होते. फिंच जखमी असल्याने उद्या सिमन्सला उतरविण्याचा जुगार खेळावा लागेल. या संघाला दिलासा देणारी बाब म्हणजे रोहित, भज्जी आणि पोलार्ड हे फॉर्ममध्ये आहेत. पोलार्डने राजस्थान आणि चेन्नईविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडला होता. अंबाती रायडूला अद्याप प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळालेली नाही. उद्या तो देखील उपयुक्त ठरू शकतो. गोलंदाजी मात्र फ्लॉप आहे. मलिंगाने चार सामन्यात केवळ चार गडी बाद केले व भरपूर धावा मोजल्या.