बेकहॅम कमबॅक करणार?
By Admin | Updated: June 6, 2014 09:21 IST2014-06-05T00:57:56+5:302014-06-06T09:21:33+5:30
इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता पुन्हा मैदानावर कमबॅक करू शकतो़ तो मियामीमध्ये मेजर लीग सॉकर टीम लाँच करण्याच्या तयारीत आह़े

बेकहॅम कमबॅक करणार?
>मियामी : इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता पुन्हा मैदानावर कमबॅक करू शकतो़ तो मियामीमध्ये मेजर लीग सॉकर टीम लाँच करण्याच्या तयारीत आह़े याच संघाकडून तो खेळण्याची शक्यता आह़े
39 वर्षीय बेकहॅम याने गतवर्षी पॅरिस सेंट जर्मन क्लबकडून खेळताना फ्रेंच लीग किताब मिळविल्यानंतर 2क् वर्षाच्या आपल्या फुटबॉल कारकीर्दीचा अखेर केला होता़ मात्र, हा खेळाडू आपल्या जीवनात या खेळाला सध्या खूप मिस करीत आह़े
तो म्हणाला, की फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे जीवनात काहीतरी हरवल्यासारखे वाटत आह़े त्यामुळे आता पुन्हा फुटबॉलमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा आह़े
इंग्लंडकडून 115 सामने खेळलेला बेकहॅम हा मियामीत एक फुटबॉल टीम सुरूकरण्याच्या तयारीत आह़े बेकहॅम आणि त्याच्या व्यावसायिक भागीदारांनी गत महिन्यात मियामीत एक स्टेडियम बनविण्याची योजना तयार केली आह़े (वृत्तसंस्था)