शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पत्नीने दिलेली हॅट ठरली ‘लकी’, मनीष नरवालला सुवर्ण, सिंहराज अडानाला रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 05:33 IST

पॅरालिम्पिक नेमबाजीत डबल धमाका

सिंहराज अडाना यांनी फायनलमध्ये पत्नीने दिलेली हॅट घातली होती. ही हॅट आपल्यासाठी फार लकी असल्याचे त्यांनी दुसरे स्थान घेतल्यानंतर सांगितले. सिंहराजचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सेनेत काम केले. सिंहराज हे बालपणापासून गरीब मुलांचे शिक्षण आणि दिव्यांगांच्या अधिकारासाठी झटत आहेत. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी नेमबाजी सुरू केली. त्यासाठी ४० किलोमीटर दूर असलेल्या नेमबाजी रेंजवर सराव करायचे. राष्ट्रीय कोच सुभाष राणा हे त्यांचे मार्गदर्शक. लॉकडाऊन काळात सिंहराज यांनी घरीच रेंज बनवून सराव केला.

टोकियो : पॅरालिम्पिकमध्ये शनिवारी भारतीय नेमबाजांनी डबल धमाका केला. मनीष नरवाल आणि सिंहराज अडाना यांनी पी४ मिश्र ५० मीटर पिस्तूल एसएच१ नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविले. पात्रता फेरीत सिंहराज ५३६ गुणांसह चौथ्या, तर मनीष नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता. यासह भारताच्या पदकांची संख्या १५ झाली. त्यात ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

पॅरालिम्पिकमध्ये ३९ वर्षांच्या सिंहराजचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी त्याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ मध्ये कांस्य जिंकले होते. विश्वविक्रमाचा मानकरी असलेल्या १९ वर्षांच्या नरवालने २१८.२ गुण मिळवीत विक्रम केला, तर सिंहराजने २१६.७ गुणांसह रौप्य जिंकले. हे दोन्ही नेमबाज फरिदाबादचे आहेत.मनीषला सहा, सिंहराजला चार कोटी मिळणारहरियाणा सरकारने फरिदाबादचे खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण विजेता मनीष नरवाल याला सहा कोटी तर रौप्य विजेता सिंहराज अडाना याला चार कोटी रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला आहे.

मनीषला बनायचे होते  फुटबॉलपटूमनीष नरवालला बालपणापासून खेळाची आवड होती. त्याला फुटबॉलपटू बनायचे होते. उजव्या हाताला अपंगत्व असल्याने त्याचे स्वप्न भंगले. त्याचे पहिलवान वडील दिलबाग यांनी प्रयत्नपूर्वक दिव्यांग मुलाला २०१६ ला राकेश ठाकूर या नेमबाजी कोचच्या स्वाधीन केले. तेथे मनीषने मेहनत घेतली. पॅरालिम्पिकबाबत त्याला कोच जयप्रकाश नौटियाल यांनी माहिती दिली. २०१७ च्या बँकॉक विश्वचषकात मनीषने वैयक्तिक सुवर्ण जिंकले.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाGoldसोनं