शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर; कारणही सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 18:41 IST

Sarabjot Singh and Manu Bhaker : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारनं नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र दोघांनीही ही सरकारी नोकरी करण्यास नकार दिला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये (Paris Olympics 2024) भारताला नेमबाजीच्या स्पर्धेत तीन पदकं मिळाली. भारताची महिला नेमबाज मनू भाकरनं ऐतिहासिक कामगिरी करत दोन कांस्य पदकांवर निशाणा साधला. तर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र क्रीडाप्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत सरबज्योत सिंग-मनू भाकर जोडीनं कांस्य पदक पटकावलं. 

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारनं नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र दोघांनीही ही सरकारी नोकरी करण्यास नकार दिला आहे. तसंच, सरबज्योत सिंग आणि मनू भाकरनं नोकरीची ऑफर न स्वीकारण्याचं कारणही सांगितलं आहे.

याबाबत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया समन्वयक मुकेश वशिष्ठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरबज्योत सिंग आणि मनू भाकरला नोकरी जॉईन करणं, कठीण आहे. हे दोघेही पदकासाठी खेळत आहेत, असं मुकेश वशिष्ठ म्हणाले. सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांचं म्हणणं आहे की, ते नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्ण पदकांसाठी खेळत आहे. दरम्यान, मनू भाकर आणि सबरज्योत सिंग यांना क्रीडा विभागात उपसंचालकपदाची ऑफर देण्यात आली होती. दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयानं ३० लाख रूपयांचे बक्षीस दिलं आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची आज भेट घेतली. यानंतर मनू भाकरनं सोशल मीडियावर ट्विट करत आभार मानले आहेत.  क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल खूप आभार. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी देशाचे खेळाडू आणखी उंच शिखरावर पोहोचतील अशी मला खात्री आहे, असं मनू भाकरनं ट्विटद्वारे म्हटलं आहे. 

भारताला एकूण ६ पदकंपॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतानं एकूण ६ पदकं जिंकली आहेत. यामध्ये ५ कांस्य आणि १ रौप्य पदक आहे. नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकलं. तर भारतीय हॉकी संघानं कांस्यपदक जिंकलं आहे. नेमबाजीत देशाला तीन पदकं मिळाली आहेत. ही तिन्ही कांस्य पदकं आहेत. कुस्तीतूनही पदक मिळालं आहे. अमन सेहरावतनं कुस्तीत कांस्य पदक जिंकलं आहे.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४HaryanaहरयाणाIndiaभारतShootingगोळीबार