शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ashleigh Barty vs Karolina Pliskova: काेण बनणार विम्बल्डन क्वीन; ग्रॅन्डस्लॅम जेतेपदासाठी बार्टी-पिलिसकोवा यांच्यात निर्णायक लढत आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 09:08 IST

Ashleigh Barty vs Karolina Pliskova: ऑस्ट्रेलियाच्या २५ वर्षांच्या अव्वल मानांकित अ‍ॅश्ले बार्टी हिने उपांत्य लढतीत २०१ ८ च्या विजेत्या अँजेलिक कर्बर हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. झेकोस्लोव्हाकियाची आठवी मानांकित कॅरोलिना पिलिसकोवाने दुसरी मानांकित आर्यना सबालेंका हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

लंडन : मागच्या सात ग्रॅन्डस्लॅममध्ये दुसऱ्या जेतेपदासाठी सज्ज असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीला शनिवारी विम्बल्डनटेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या निर्णायक लढतीत कॅरोलिना पिलिसकोवा हिचे अवघड आव्हान पेलावे लागणार आहे. पिलिसकोवा दुसऱ्यांदा ग्रॅन्डस्लॅमच्या अंतिम फेरीत दाखल झाली असली तरी तिला पहिल्यावहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे.ऑस्ट्रेलियाच्या २५ वर्षांच्या अव्वल मानांकित अ‍ॅश्ले बार्टी हिने उपांत्य लढतीत २०१ ८ च्या विजेत्या अँजेलिक कर्बर हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. झेकोस्लोव्हाकियाची आठवी मानांकित कॅरोलिना पिलिसकोवाने दुसरी मानांकित आर्यना सबालेंका हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

‘ आज मी सर्वोत्तम खेळ केला . फ्रेंच ओपन नंतर इथल्या सामन्यात फार कमी कालावधी असल्याने सराव, शारीरिक क्षमता आणि नियोजन याला कमी वेळ मिळतो . अंतिम सामन्यासाठी उत्सुक असून बालपणापासून जोपासलेले स्वप्न पूर्ण होईल, यात शंका नाही .’- ॲश्ले बार्टी

‘या वाटचालीवर विश्वासच बसत नाही. अंतिम फेरीत जाण्याचा विचार देखील केला नव्हता. पहिला सेट गमावूनही मी पुढे परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. अर्थातच ॲश्लेला हरविणे सोपे नाही. पण मी पूर्वी तिला हरविले आहे.त्यामुळे अटीतटीची लढत अपेक्षित आहे.’- कॅरोलिना पिलिसकोवा

पिलिसकोवा ही २०१६ च्या अमेरिकन ओपनमध्ये अव्वल मानांकन लाभलेल्या दोन खेळाडूंना पराभूत करण्याच्या जवळपास पोहोचली होती. 

तिने उपांत्य सामन्यात सेरेना विलियम्सचा तर पराभव केला मात्र अंतिम लढतीत नंबर दोन ॲंजेलिस कर्बरकडून ती पराभूत झाली. बार्टी आणि पिलिसकोवा यांच्यात आतापर्यंत ७ सामने झाले. त्यात बार्टीने ५-२ अशी बाजी मारली.

४१ वर्षानंतर इतिहास घडणार? उदय बिनिवाले -लंडन: ओपन युगात केवळ तीन महिला खेळाडू अशा आहेत की ज्यांनी अव्वल मानांकित खेळाडूंना नमवून जेतेपदावर मोहोर उमटविली आहे. पिलिसकोवा ही देखील या श्रेणीत येण्यास इच्छूक असेल. व्हीनस विलियम्स हिने २००० आणि २००५ ला दोनदा ही किमया केली. त्याआधी ॲन्नी जोन्स हिने १९६९ आणि इवोनी गुलागोंगने १९७१ ला अशी कामगिरी केली होती. गुलागोंगने आपले दुसरे विम्बल्डन १९८० ला जिंकले होते. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाची खेळाडू सेंटर कोर्टवर चॅम्पियन बनू शकली नाही. आता बार्टी तब्बल ४१ वर्षानंतर गुलागोंगच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.  

टॅग्स :TennisटेनिसWimbledonविम्बल्डनEnglandइंग्लंड