शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर कसे असेल क्रीडाविश्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:55 IST

खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यासारखाच राहील? यासारख्या अनेक प्रश्नांवर वृत्तसंस्थेच्यावतीने देशभरातील दिग्गज खेळाडूंशी चर्चा करण्यात आली. यावर अनेकांची मते संमिश्र राहिली.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर विजय मिळवल्यानंतर प्रेक्षक पुन्हा स्टेडियममध्ये येतील? परदेशात सराव करणे पहिल्यासारखे सोपे असेल? अशा खेळांचे काय होईल, ज्यात सामाजिक अंतर राखता येणार नाही? कोरोनातून सावरल्यानंतर खेळ आणि खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यासारखाच राहील? यासारख्या अनेक प्रश्नांवर वृत्तसंस्थेच्यावतीने देशभरातील दिग्गज खेळाडूंशी चर्चा करण्यात आली. यावर अनेकांची मते संमिश्र राहिली.सचिन तेंडुलकर (क्रिकेटपटू)नक्कीच संपूर्ण जग आज सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे. माझ्या मते चेंडूला थुंकी लावताना खेळाडू काही काळ सतर्क राहतील. ही गोष्ट कायम त्यांच्या लक्षात राहील.अभिनव बिंद्रा (नेमबाज)खेळ लोकांना एकमेकांशी जोडतात. शिवाय जगभरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात खेळांचे योगदान असते. भविष्यात सुरक्षा आणि संरक्षणावर अधिक लक्ष दिले जाईल, मात्र खेळांप्रति असलेले आकर्षण कधीच कमी होणार नाही. कोरोनानंतरची परिस्थिती भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. कदाचित अनेक विदेशी स्पर्धा आणि शिबिरे होणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये भारताला क्रीडा पाया मजबूत करण्याची संधी मिळू शकते.बजरंग पुनिया (मल्ल)कुस्ती शारीरिक संपर्कवाला खेळ आहे. कुस्तीमध्ये तुम्ही कोणत्याही शारीरिक संपर्काला टाळू शकत नाही. मात्र माझ्या मते यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. मला या खेळामध्ये कोणत्याही बदलाची शक्यता दिसत नाही. सामने नक्कीच अधिक अटीतटीचे होतील. सर्व खेळाडू मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करतील.मेरी कोम (बॉक्सर)सर्व प्रकारच्या गोष्टी पहिल्यासारख्या सुरू होण्यासाठी प्रार्थना करत आहे. हा विषाणू सर्वांचा शत्रू असून याला कुणीही समजू शकलेला नाही. खेळांमध्ये बदल होतील. माझा खेळात शारीरिक संपर्क होतो आणि वैयक्तिकरीत्या मी चिंतित आहे की, आम्ही ही अडचण कशी टाळू शकतो. माझ्या मते सरावही वैयक्तिक होऊ शकतो. प्रेक्षकांच्या बाबतीत म्हणायचे, तर ते सामने पाहण्यास येतील. एक नक्की की, स्पर्धेत स्वच्छतेचा स्तर खूप उंचावेल.बायचुंग भुतिया (फुटबॉलपटू)आजच्या युगात टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे भाग आहेत आणि यामुळे स्टेडियममधील प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे क्रीडा व्यवसाय प्रभावित होईल, असे मला वाटत नाही. उलट यामुळे टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मला अधिक फायदा होईल.