धोनीचे भविष्यात स्थान काय असेल?

By Admin | Updated: October 11, 2015 04:58 IST2015-10-11T04:58:18+5:302015-10-11T04:58:18+5:30

भारतीय वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे कर्णधार म्हणून आणि खेळाडू म्हणून संघात भविष्यातील स्थान काय असेल, याचा निवड समितीने आढावा घेण्याची

What will be the future of Dhoni? | धोनीचे भविष्यात स्थान काय असेल?

धोनीचे भविष्यात स्थान काय असेल?

नवी दिल्ली : भारतीय वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे कर्णधार म्हणून आणि खेळाडू म्हणून संघात भविष्यातील स्थान काय असेल, याचा निवड समितीने आढावा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकरने केले आहे. आगरकरने कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि धोनी यांची तुलना करताना मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर धोनीच्या भविष्यावर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पूर्वसंध्येला एका संकेतस्थळाशी बोलताना आगरकर म्हणाला, ‘‘भारतीय संघाकडे उमेश यादवसारखा चांगला गोलंदाज आहे. परंतु टी-२० मध्ये अजून काही तरी कमी पडत आहे.’’ आगकर म्हणाला, ‘‘आपल्याला जलदगती गोलंदाजांपेक्षा चांगल्या गोलंदाजाची गरज आहे, असे धोनी नेहमी म्हणत असतो. परंतु टी-२० मालिकेत हे सिद्ध झाले, की संघाला चांगल्या गुणवत्तावान गोलंदाजांची गरज आहे. जलदगती गोलंदाजांना छोट्या प्रारूपामध्ये बॅडपॅचमधून जावे लागते. मला वाटते, निवड समिती धोनीवर जास्त विसंबून आहे. धोनी हा पूर्णपणे व्यावहारिक होऊन विचार करतो, जे कधी कधी उपयोगी ठरत नाही, जेथे लाईन आणि लेंग्थवर गोलंदाजी करण्याची गरज असते, अशा खेळपट्ट्यांवर उमेशसारखा गोलंदाज सामन्याचे चित्र पालटू शकतो.’’
धोनीच्या संघातील स्थानाविषयी बोलताना आगरकर म्हणाला, ‘‘मला वाटते, आता धोनीच्या कामगिरीची कर्णधार म्हणूनच नव्हे, तर एक खेळाडू म्हणूनही समीक्षा व्हावी. धोनी हा भारताचा चांगला खेळाडू आहे, परंतु तो चांगला आहे, म्हणून त्याला किती फायदा देणार तो संघावर बोजा बनता कामा नये. अनेक वर्षे तो कर्णधार आहे, म्हणून त्याचा फॉर्म नसला तरी चालेल, असे असता कामा नये.’’
द. आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे, असे सांगताना आगरकर म्हणतो, ‘‘सर्वसाधारणपणे भारत वनडेत चांगला खेळतो, पण आपण वर्ल्डकप उपांत्य फेरीत पराभूत झालो. बांगलादेशात आपण हरलो. तेथेही धोनी कर्णधार होता. आता आपण टी-२० मालिका गमावली. (वृत्तसंस्था)

धोनी चौथ्या क्रमांकावर का?
अजिंक्यऐवजी धोनीने वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस यावे, हे लॉजिकही पटत नाही, असे आगरकरचे स्पष्ट मत आहे. तो म्हणतो, ‘‘तुम्ही पुढील वर्ल्डकपसाठी संघबांधणी करीत आहात. त्या संघात धोनी असेल की नसेल हे सांगता येत नाही, असे असताना धोनी आपल्या कारकिर्दीच्या उतरणीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला जातो, हे कसे? जर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाज नसेल तर एक वेळ ठीक. पण तिथे अजिंक्य आहे.

Web Title: What will be the future of Dhoni?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.