शोएब मलिकने भारतीयांना काय दिल्या शुभेच्छा, सांगते आहे सानिया मिर्झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:49 IST2018-08-15T15:48:56+5:302018-08-15T15:49:53+5:30

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने मात्र भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलिकने नेमक्या काय शुभेच्छ्या दिल्या, हे भारताची टेनिस सम्राज्ञी आणि शोएबची पत्नी सानिया मिर्झाने सांगितले आहे.

What Shoaib Malik has given wishes to Indians, telling Sania Mirza | शोएब मलिकने भारतीयांना काय दिल्या शुभेच्छा, सांगते आहे सानिया मिर्झा

शोएब मलिकने भारतीयांना काय दिल्या शुभेच्छा, सांगते आहे सानिया मिर्झा

ठळक मुद्देसानियाने तिरंग्याच्या रंगातील कपड्यांसह फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर सानियाने फडकत्या तिरंग्याला सलामी देत असतानाचाही फोटो पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू. दोन्ही देशांतील लोकं एकमेकांना अजूनही पाण्यात पाहतात. एकमेकांना शुभेच्छा देणे तर दूरची बात. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने मात्र भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलिकने नेमक्या काय शुभेच्छ्या दिल्या, हे भारताची टेनिस सम्राज्ञी आणि शोएबची पत्नी सानिया मिर्झाने सांगितले आहे.

सानियानेदेखील आपल्या ट्विटरवर भारतीयांना स्वातंत्र्य दिनाचा संदेश दिला आहे. त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्य दिनीच आपण टेनिसमधील पहिला गुण मिळवला होता, हेदेखील सांगितले आहे. सानियाने तिरंग्याच्या रंगातील कपड्यांसह फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर सानियाने फडकत्या तिरंग्याला सलामी देत असतानाचाही फोटो पोस्ट केला आहे. ट्विटरवरील एका व्हिडीओमध्ये तिने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

सानियाच्या संदेश देणारा व्हिडीओ पाहा


भारतीयांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, असं म्हणताना शोएब सानियालाही विसरलेला नाही. शोएबने या आशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर सानियाने शोएबच्या ट्विटला सानियाने प्रतिसादही दिला आहे.

शोएब आणि सानियाचे ट्विट पाहा


Web Title: What Shoaib Malik has given wishes to Indians, telling Sania Mirza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.