सराव सामन्यात भारताचे वेस्ट इंडिजला १८६ धावांचे लक्ष्य

By Admin | Updated: March 10, 2016 21:33 IST2016-03-10T21:30:13+5:302016-03-10T21:33:08+5:30

रोहित शर्माच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य दिले आहे.

West Indies won the toss and elected to bat first | सराव सामन्यात भारताचे वेस्ट इंडिजला १८६ धावांचे लक्ष्य

सराव सामन्यात भारताचे वेस्ट इंडिजला १८६ धावांचे लक्ष्य

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. १० - सलामीवीर रोहित शर्माच्या ५७ चेंडूत नाबाद ९८ धावा, युवराज सिंहच्या २० चेंडूत ३१ धावा आणि शिखर धवनच्या २१ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य दिले आहे. 
भारताने निर्धारीत वीस षटकात सहा बाद १८५ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत रोहितने तुफानी फलंदाजी केली. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि सात षटकार लगावले. 
तिस-या विकेटसाठी रोहित आणि युवराजने सर्वाधिक ८९ धावांची भागीदारी केली. नुकताच आशिया चषक उंचावणा-या भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. सराव सामना असल्याने दोन्ही संघांमध्ये १५ खेळाडू आहेत. 
 

Web Title: West Indies won the toss and elected to bat first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.